मुंबई

Navi Mumbai: नवी मुंबईत ‘मतदार अन् लोकशाही’ची लग्नपत्रिका

CD

Vashi News: सध्या देशात लोकसभेच्या निवडणुका सुरू असून काही राज्यांमध्ये मतदानाचा टक्का घसरला आहे. त्यामुळे ठाणे लोकसभा मतदानात जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, यादृष्टीने नवी मुंबई महापालिकेच्या वतीने मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे.

याचाच एक भाग म्हणून निवडणूक आयोगाकडून लग्नपत्रिकेच्या स्वरूपात मतदानाची पत्रिका छापली असून पालिकेच्या विभाग कार्यालयाबाहेर तसेच सरकारी कार्यालयांच्या बाहेर चिकटवण्यात आली आहे. समाजमाध्यमांवरदेखील या पत्रिकेची चर्चा सुरू आहे.

भारतीय नागरिकांचा ज्येष्ठ चिरंजीव चि. मतदार व भारतीय संविधानाची ज्येष्ठ सुकन्या चि.सौ.कां. लोकशाही यांचे सोमवारी, २० मे रोजी सकाळी सात ते सायंकाळी पाच या शुभमुहूर्तावर लग्न होणार आहे.

लोकसभा २०२४च्या निमित्ताने भारतीय संविधानाने दिलेल्या मतदानाचा पवित्र हक्क बजावण्याची सुसंधी, उज्ज्वल भारताची स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आपले एक पाऊल, आपला आवाज संसदेत पाठविण्यासाठी आपल्या एक एक मतदानरूपी आशीर्वादाने हा राष्ट्रीय उत्सव साजरा व्हावा, यासाठी आग्रहाचे निमंत्रण देण्यात आले आहे.
-------------
‘आपले मतदान हाच आमचा आहेर’
‘आपले मतदान हाच आमचा आहेर आणि विकसित भारत हेच तुमचे रिटर्न गिफ्ट’ असा पत्रिकेतील टीपमध्ये संदेश देण्यात आला आहे. या पत्रिकेतून मतदानांची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे.

त्याचप्रमाणे नवी मुंबई महापालिकेने पालिकेच्या मालमत्ता करांवर ‘मी जागरूक मतदार, मतदान करणारच’ असा उल्लेख करत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. एनएनएमटीमध्येदेखील जनजागृती करण्यात येत आहे; तर शहरात पालिकेने फ्लेक्स लावले आहेत.

निळ्या शाईचे आवाहन
पत्रिकेच्या समारोपामध्ये ‘वरील विनंतीला मान देऊन मतदानाला यायचं हं...’ ‘आमच्याशिवाय तर मज्जाच नाही’ असा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच कु. निळी शाई आणि चि. ईव्हीएम यांनी मतदानाला येण्याचे आवाहन केले आहे.

लोकसभा निवडणुकीत मतदानांची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. पथनाट्य, पालिकेच्या मालमत्ताकराच्या पावतीवरदेखील संदेश देण्यात आला आहे. तसेच शहरांमध्ये फलक लावण्यात आलेले आहे. पालिकेच्या मुख्यालयात स्क्रीन लावण्यात आलेली आहे.
- शरद पवार, उपआयुक्त, निवडणूक विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलने झळकावले इतिहासातील वेगवान द्विशतक! विक्रमांचा पाऊस अन् टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन सेटवर घसरून पडले, गुडघ्याला दुखापत; उभं राहता येईना, नेमकं काय घडलं?

Pune News: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ब्रेक; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर २ ऑक्टोबरचे सत्याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित

Rohit Sharma Celebration : शतकानंतर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा अन् सुनील गावस्कर काय म्हणाले ऐका Video Viral

Sharad Pawar Drought Tour : शरद पवार करणार दुष्काळ दौरा; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

SCROLL FOR NEXT