मुंबई

Navi Mumbai: पोलिसांचा नंबर इंटरनेटवर शोधला, सायबर चोरट्यांकडून महिलेला ८२ हजारांचा गंडा

पतीच्या खात्यातून ८२ हजारांची रक्कम परस्पर काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.|It has been revealed that the amount of 82 thousand was mutually withdrawn from the husband's account

सकाळ वृत्तसेवा

Navi Mumbai: अज्ञात सायबर चोरट्यांनी पोलिसांकडे ऑनलाईन तक्रार नोंदविण्यासाठी गुगलवरून नंबर शोधण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका महिलेची तक्रार नोंदवून घेण्याच्या बहाण्याने तिच्या पतीच्या खात्यातून ८२ हजारांची रक्कम परस्पर काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

कोपरखैरणे पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात सायबर चोरट्याविरोधात फसवणुकीसह आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

या प्रकरणी फसवणूक झालेली विधी लछवानी ही महिला कोपरखैरणे येथे राहण्यास असून काही महिन्यांपूर्वी तिला पोलिसांकडे ऑनलाईन तक्रार करायची होती. त्यासाठी तिने आपल्या पतीच्या मोबाईल फोनवरून गुगलद्वारे पोलिसांचा नंबर शोधण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिचा संपर्क सायबर चोरट्यांशी झाला. सायबर चोरट्यांनी तिची तक्रार नोंदवून घेण्याच्या बहाण्याने तिला एक लिंक पाठवून त्यात तिची संपूर्ण माहिती भरण्यास सांगितले.

त्यानुसार विधी हिने संपूर्ण माहिती भरल्यांनतर सायबर चोरट्यांनी दोन रुपये शुल्‍क भरण्याच्या बहाण्याने तिला ओटीपी शेअर करायला सांगितले. त्यानुसार विधी हिने ओटीपी शेअर केल्यानंतर तिच्या पतीच्या खात्यातून दोन रुपये वजा झाले.

मात्र, काही वेळातच दोन रुपये परत खात्यावर आले. या प्रकारामुळे विधीला संशय आल्याने तीने तत्काळ बँकेशी संपर्क साधून आपल्या पतीचे बँक खाते बंद करून घेतले.

त्यानंतर विधीच्या पतीने काही दिवसांनंतर बंद केलेले बँक खाते पुन्हा सुरू केले. मात्र, तोपर्यंत सायबर चोरट्यांनी त्यांच्या खात्यातून ८२ हजारांची रक्कम काढून घेतली. त्यानुसार तिने कोपरखैरणे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT