मुंबई

‘मुंबई मेट्रो वन’कडे मालमत्ता कर थकीत

CD

‘मुंबई मेट्रो वन’कडे मालमत्ता कर थकीत
४६१ कोटी रुपयांची बाकी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : वर्सोवा ते घाटकोपरदरम्यान मेट्रो रेल्वे सेवा देणाऱ्या मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने पालिकेचा २०२२-२३ या आर्थिक वर्षापर्यंतचा ४६१ कोटी १७ लाख ६१५ रुपयांचा मालमत्ता कर थकविला आहे. याबाबत महापालिका प्रशासनाकडून मुंबई मेट्रो वनच्या व्यवस्थापनाकडे सातत्याने पाठपुरावा करूनही त्यांनी अद्यापही करभरणा केला नसल्याची माहिती प्रशासनाने दिली.
मुंबईतील विविध मालमत्ताधारकांकडून करवसुली करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. मालमत्ताधारकांनी अंतिम देय मुदतीपूर्वी करभरणा करून कठोर दंडात्मक कार्यवाही टाळावी आणि करभरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेच्या वतीने सातत्याने केले जात आहे. करभरणा न करणाऱ्या बड्या मालमत्ताधारकांना नोटीसही बजावण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाने दिली. अंधेरी पश्चिम आणि कुर्ला विभागातील मालमत्तांसंदर्भात मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडला पालिकेच्या वतीने नोटीस जारी करत २१ दिवसांच्या आत मालमत्ता करभरणा करण्यास सांगितले आहे. के (पूर्व) आणि एन विभागाकडून नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू आहे. याशिवाय, मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडच्या चार विभागांतील २८ मालमत्तांसाठी २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी १८ कोटी २९ लाख ३६ हजार ११ रुपये इतका कर आकारण्यात आला आहे. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा मालमत्ता करभरणा करण्याचा अंतिम तारीख २५ मे २०२४ आहे. मालमत्ताधारकांनी अंतिम देय मुदतीपूर्वी करभरणा न केल्यास त्यांच्यावर कठोर दंडात्मक कार्यवाही केली जाईल. त्यामुळे नागरिकांनी मुदतीपूर्वी त्यांच्या मालमत्तांसंबंधी कराचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
...
कोट्यवधीचा कर थकीत
वर्सोवा ते घाटकोपरदरम्यान मेट्रो रेल्वे सेवा देणाऱ्या मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडकडे मुंबईतील चार विभागांमधील एकूण २८ मालमत्तांचा २०२२-२३ या आर्थिक वर्षाचा कर थकीत आहे. त्यापैकी के (पश्चिम) विभागातील एकूण १८ मालमत्तांसाठी ३११ कोटी ७७ लाख ८५ हजार ६६८ रुपये; के (पूर्व) विभागातील सहा मालमत्तांसाठी ११६ कोटी २९ लाख एक हजार ५१ रुपये; एल विभागातील दोन मालमत्तांसाठी १९ कोटी चार लाख ६२९ रुपये आणि एन विभागातील दोन मालमत्तांसाठी १४ कोटी सहा लाख १३ हजार २६७ रुपये इतका कर थकीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari and Next PM : ''म्हणून मोदींनंतर गडकरीच पंतप्रधान...''; काँग्रेस नेत्याने केलंय मोठं विधान!

Viral News : कारागिराने जबड्यात लपविले 15 लाखांचे सोने, पण 'या' एका चुकीमुळे उघड झाली चोरी

१० लाख शेतकऱ्यांनी भरल पीकविमा! डाळिंबसाठी आज तर सिताफळासाठी ३१ जुलैला संपणार मुदत; ॲग्रीस्टॅक असेल तरच भरता येणार पीकविमा

Latest Marathi News Updates: हरिद्वारमध्ये बुडणाऱ्या कावडियांना एसडीआरएफच्या जवानांनी वाचविले

Cyber Fraud Alert: सायबर फसवणुकीचा नवा प्रकार; काय आहे 401# कोड आणि त्याचे धोके, जाणून घ्या आणि आताच सावध व्हा!

SCROLL FOR NEXT