मुंबई

CD

शिक्षकांची वेळेची व विचारांची गुंतवणूक चांगले विद्यार्थी घडवतात
डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांचे प्रतिपादन
नेरळ, ता. ३० (बातमीदार) : एक उत्तम विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षकांना वेळेची व विचारांची गुंतवणूक करावी लागते. शिक्षकांनीसुद्घा विद्यार्थ्यांबरोबर सहपाठी राहिले पाहिजे, असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांनी कर्जत येथे केले. कर्जतमधील अभिनव ज्ञानमंदिर संस्थेच्या नवीन इमारतीचे उद्‍घाटन सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
सेवा सहयोग फाऊंडेशन विद्यार्थी विकास योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या अभिनव ज्ञानमंदिर संस्थेच्या नवीन इमारतीचे उद्‍घाटन एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी चक्रदे‍व पुढे म्‍हणाल्‍या की, जसे वातावरण असते तसे आपण वागतो. तसे आपण नकळत घडत जातो. त्याचप्रमाणे शिक्षणाचा व वातावरणाचा जवळचा संबंध आहे. खेळीमेळीचे वातावरण निर्मित्ती होण्यासाठी सुसज्ज इमारत हवी असते. विद्यार्थी येथे चांगल्याप्रकारे शिकतील. जर वास्तू चांगली असेल तर विद्यार्थ्यांना आश्वस्त वाटेल. शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी प्रकल्प तयार करणे आवश्यक असल्‍याचे डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांनी यावेळी सांगितले. तर मुख्याध्यापक धुरजी शिंदे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. रवींद्र कर्वे यांनी प्रास्ताविक करताना, लीना देवस्थळी यांनी एक कोटी रुपये द्यावेत, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांनी तीन कोटी आठ लाख रुपये देऊन ही इमारत पूर्ण केली. आमची संस्था दोन प्रकारे काम करते. ठाणे, रायगड जिल्ह्यात सातवीपर्यंत शाळा सुरू करण्यात आली आहे. तर माणगाव, उसर, रातवड येथेही शाळांच्या इमारती उभारल्या आहेत. देणग्यासुध्दा खूप मिळत आहेत. सचिन तेंडुलकर संस्थेला दरवर्षी ७५ लाख रुपये देत आहे. ३५ जिल्ह्यात शंभर समन्वयक आहेत. त्यांच्याकडून विद्यार्थी येत असतात. हेच विद्यार्थी उच्च पदस्थ झाल्यावर संस्थेला देणग्या देतात. त्यामुळे पूर्वी समाजावर आवलंबून असलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत ५१ लाख रुपये दिले आहेत. संस्था अठरा राज्यातील विद्यार्थ्यांना सहकार्य करीत आहे, असे स्पष्ट केले. याप्रसंगी वास्तूविशारद ब्रीद जगताप, ठेकेदार रामभाऊ वाघमारे आणि इमारतीचे काम चांगल्या प्रकारे व्हावे, यासाठी लक्ष ठेवणारे सुहास थावरे यांचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला. मिताली मुसळे व सविता हाके यांनी सूत्रसंचालन केले. नंदकुमार मणेर यांनी आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी गोविंद पारटकर, अशोक बोरगावकर, शिरीष चाक्रदेव आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात आहे काय? तुम्ही आमच्या पैशावर जगताय; भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान

Bus Accident : समोरून आलेल्या कारला वाचवताना बसचा भीषण अपघात; 8 जण जागीच ठार, 32 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

Mahadev Munde Case: परळी येथील महादेव मुंडे खूनप्रकरणी विजयसिंह बांगरचा जबाब नोंदविला

SCROLL FOR NEXT