Mumbai Crime News sakal
मुंबई

Mumbai Crime News: दाऊदच्या मालमत्तेचे अखेर हस्तांतर, भूपेंद्र कुमार भारद्वाज यांनी केलेली खरेदी

CD

Mumbai Crime News : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कासकर याची रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील मुंबके गावात मालमत्ता दिल्ली उच्च न्यायालयाचे वकील भूपेंद्र कुमार भारद्वाज यांनी साफेमाअंतर्गत झालेल्या लिलावात खरेदी केली होती

२३ फेब्रुवारी २०२४ रोजी दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेचे भारद्वाज यांच्या नावे हस्तांतरित होती. अखेर सातबाराही त्यांच्या नावावर झाला आहे.

२०२० मध्ये झालेल्या सार्वजनिक लिलावात भारद्वाज यांनी दाऊदच्या दहा हजार चौरस फूट जमिनीची यशस्वी बोली लावली होती. मालमत्ता खरेदी केल्यानंतर त्यापुढील नोंदणीचे काम एवढे सोपे नाही, असे भारद्वाज सांगत होते. लिलावादरम्यान आपल्या डोक्याला खिळे का ठोकून घेत आहात, असा सवाल पोलिसांनी विचारला होता.

हे संपूर्ण गाव दाऊदचे आहे. तुम्हाला कुणी मदत करणार नाही, असे त्यांना सांगण्यात आले होते. त्यांच्यावर दबावही आला; पण त्यांनी मालमत्ता खरेदी करून तीन वर्षे उलटून गेले तरीही मालमत्तेची नोंदणी भारद्वाज यांच्या नावावर झाली नव्हती. मात्र, आता नुकताच या जमिनीचा सातबारा भारद्वाज यांच्या नावावर झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जरांगेंनी पुनर्विचार करावा, ऐन गणेशोत्सवात आंदोलन योग्य नाही; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! ऑगस्टचा हप्ता 'या' तारखेपासून खात्यात जमा होणार?

“लग्न करण्याची इच्छा…” प्राजक्ता माळी 'लग्नपंचमी' नाटक पाहिल्यानंतर म्हणाली...'आज कळलं की...'

Pimpri Chinchwad Accident news : भरधाव डंपरच्या धडकेत तरुण वकील साक्षी चौभेचा मृत्यू, पिंपरीत हळहळ

CSMT-Sawantwadi Express : स्वच्छतागृहात सांडपाणी अन् फुटलेल्या काचांवर पुठ्ठे; सावंतवाडी एक्स्प्रेसच्या पहिल्याच प्रवासातील दुरवस्थेचा व्हिडिओ व्हायरल, ट्रेनमधील धक्कादायक वास्तव समोर

SCROLL FOR NEXT