मुंबई

देशाच्या विकासात महाराष्ट्राचे मोलाचे योगदान :

CD

देशाच्या विकासात महाराष्ट्राचे मोलाचे योगदान : जिल्‍हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांचे उद्‌गार
सकाळ वृत्तसेवा 
मुंबई, ता. १ : राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपासून देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि त्यानंतरही देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने हिरिरीने सहभाग घेतला आहे. प्राचीन संस्कृतीचा वारसा सांभाळतानाच देशाच्या विकासातही मोलाचे योगदान दिले आहे. महाराष्ट्राचा धार्मिक, सामाजिक सुधारणांचा इतिहास प्रेरणादायी आहे. लोकशाहीला अधिक मजबूत बनविण्यासाठी आपण सर्वांनी मतदानाच्या या प्रक्रियेत सहभागी होऊन २० मे २०२४ रोजी मतदानाचा हक्क बजावू या, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी केले.
मुंबई उपनगर जिल्ह्याधिकारी कार्यालय, चेतना कॉलेजजवळ सकाळी भव्य सायकल रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी रॅलीची सुरुवात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर व अन्य प्रमुख अतिथी यांच्या उपस्थितीमध्ये झेंडा दाखवून करण्यात आली.
या रॅलीमध्ये मुंबई शहरच्या अपर जिल्हाधिकारी फरोग मुकादम, अपर जिल्हाधिकारी तथा स्वीपचे नोडल अधिकारी किरण महाजन, मुंबई महानगरपालिका उपयुक्त विश्वास मोटे, उपजिल्हाधिकारी संदीप निश्चित, स्वीपचे नोडल अधिकारी डॉ. सुभाष दळवी, समाजकल्याणचे सहायक आयुक्त प्रसाद खैरनार आणि जिल्ह्यातील सायकल ग्रुपचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

मतदानाची टक्‍केवारी वाढवा
मुंबई उपनगर जिल्ह्यात मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघात २० मे रोजी मतदान होणार आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या या महोत्सवात अधिकाधिक मतदारांनी मतदान करून आपले कर्तव्य पार पाडावे, तसेच मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय व ‘स्वीप’ उपक्रमाच्या माध्यमातून जनजागृतीचे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मतदारांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी महाराष्ट्र दिनी या बीवायसीएस, मुंबई व मुलुंड रायडर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या पुढाकाराने या सायकल रॅलीचे आयोजन केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Retirement Plan : आता रिटायरमेंटनंतर पैशांची चिंता नाही! या 5 योजनांत गुंतवणूक करा; तिजोरी भरलेलीच राहील, दरमहा मिळेल मोठी पेन्शन

Latest Maharashtra News Updates Live: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार या सिंहाचा आणि अजित पवार या वाघांचा वारसा सांगणारा-आमदार अमोल मिटकरी

Mangal Gochar 2026: 18 वर्षांनंतर कुंभ राशीत मंगल गोचर! अग्नि-वायु एकत्र येऊन तयार होतोय अंगारक योग, वृषभसह 'या' 5 राशींच आयुष्य होईल अगदी कठीण!

Sunset Destinations: 'Sunset Lovers' साठी भारतातील हे 4 हॉटस्पॉट्स, एकदा नक्की भेट द्या!

Viral Video : धावत्या ट्रेनमध्ये मोबाईल चोरणे पडले महागात, महिलेने चोराला शिकवली 'अशी' अद्दल, व्हिडिओ व्हायरल, सर्वत्र होतेय कौतुक

SCROLL FOR NEXT