मुंबई

नरेंद्र मोदींनी उरणकरांना विकास दिला आता उरणकरानी हक्काचा खासदार द्यावा -आ. महेश बालदी

CD

नरेंद्र मोदींनी उरणकरांना विकास दिला, आता उरणकरांनी हक्काचा खासदार द्यावा ः महेश बालदी
उरण, ता. ११ ( वार्ताहर) ः उरणकरांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य सरकारने केले आहे. त्यामुळे केंद्रात पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या रूपाने पुन्हा एकदा हक्काचा खासदार विजयी करू या, असे आवाहन उरणचे आमदार महेश बालदी यांनी उरणकरांना केले आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ उरण शहरातील तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी नगरपालिका प्राथमिक शाळेच्या मैदानात उरणकरांसोबत विकासाचा जनसंवाद या मेळाव्याचे आयोजन शुक्रवारी (१० मे) सायंकाळी करण्यात आले होते.
यावेळी उरणचे आमदार महेश बालदी यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, उरणमधील रखडलेल्या रेल्वेच्या कामाला गती देण्याचे काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्याचप्रमाणे मुंबई-उरण अटल सेतूचे काम, एसईझेड प्रकल्प, मच्छीमार बंदराचे काम, उरणला पाईपद्वारे गॅस पुरवठा, बायपास रस्ता, साडेबारा टक्क्यांचा प्रश्न, लाखो दास भक्तांचे श्रद्धास्थान असलेले श्री समर्थ स्मारकाचे काम, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील नामकरण, नगरपालिका हद्दीतील नाट्यगृह, नगरपालिका इमारत किंवा इतर महत्त्वाच्या उरणमधील विकसित प्रकल्पांना गती देण्याचे काम हे केंद्र व राज्य सरकारने केले आहे. त्यामुळे जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा भाजपचे सरकार केंद्रात येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना विजयी करण्यासाठी आपले मोलाचे मत ‘धनुष्यबाणा’ला द्या, असेही शेवटी आमदार महेश बालदी यांनी उपस्थितांना हाक दिली आहे.


यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, आरपीआय (आठवले गट) जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, मनसेचे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष भोईर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकासाचा आलेख मांडला, तसेच विरोधकांवर आपल्या भाषणातून टीका केली. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत घरत, तालुकाध्यक्ष रवी भोईर, मनसेचे तालुकाध्यक्ष ॲड. सत्यवान भगत, शिवसेनेचे उपजिल्हाध्यक्ष अतुल भगत, आरपीआयचे तालुकाध्यक्ष संजय गायकवाड, शिवसेना तालुकाध्यक्ष महेंद्र पाटील, माजी नगराध्यक्षा सायली म्हात्रे, राणी म्हात्रे, संगीता पाटील, सुधीर घरत, दिनेश तांडेल, महेश कडू, पंडित शेठ घरत, योगेश पाटील, चेअरमन प्रदीप नाखवा, शहराध्यक्ष कौशिक शहा, आजी-माजी नगरसेवक, आजी-माजी सरपंच व महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी श्रीरंग बारणे यांना उरणमधून मताधिक्य देणार असल्याचा दावा सर्वांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Video: दिवसाढवळ्या 'हॉटेल भाग्यश्री'ची फसवणूक! 'ही' आयडिया करुन लोक पैसे उकळायला लागले अन् फुटक खाऊ लागले

Viral Video: लग्नासाठी मुलगा आहे का? मुलीची अनोखी मागणी, दारुडा हवा नवरा, ५ लाख देणार हुंडा! ही 'डील' मिस करू नका!

Palghar News: महिनाभर 'या' पालघर मार्गावर अवजड वाहनांना बंदी, उल्लंघन करणाऱ्यांना प्रशासनाचा अलर्ट; काय आहेत पर्यायी मार्ग?

Latest Maharashtra News Updates : "एक मराठी प्रेमी,दुसरा खुर्चीप्रेमी" शिंदेंच्या शिवसेनेचं विजयी मेळाव्यानंतर ट्विट व्हायरल

SCROLL FOR NEXT