मुंबई

सावित्रीबाई फुले ज्युनियर कॉलेज बारावीचा निकाल. ९१.९३ टक्के

CD

घाटकोपर (बातमीदार) : प्रगती एज्युकेशनल ट्रस्ट संचालित सावित्रीबाई फुले मुलींची शाळा व ज्युनिअर कॉलेज साकीनाका या कनिष्ठ महाविद्यालयाचा मार्च २०२४ उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल ९१.९३ टक्के लागला आहे. येथील विद्यार्तिनींनी यंदाही यशाची परंपरा कायम राखलेली आहे. आर्टस शाखेचा निकाल ९५.८३% इतका आहे. कॉमर्स शाखेचा निकाल ८९.४७%. लागलेला आहे. कॉमर्स शाखेमध्ये फातिमा फिरोज पटेल ७४.३३ टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक मिळवला आहे, तर आर्टस शाखेतून प्रज्ञा विजय वंजारे हिने ६२.८३ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमाक मिळवला आहे. संस्थेच्या प्रमुख कार्यवाह प्राचार्य पुष्करिणी सुभेदार, राजेश बुमदार, ज्योती सुभेदार, सलोनी कुडाळकर यांनी सर्व उत्तीर्ण वि‌द्यार्थिनींचे, शिक्षकांचे व मुख्याध्यापिकांचे अभिनंदन केले आहे.
…..
‘एसटी मेहता’च्या विद्यार्थिनींचे घवघवीत यश
घाटकोपर (बातमीदार) : विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असणाऱ्या एस. पी. आर. जे. कन्याशाला ट्रस्ट संचालित पी. एन. दोशी महाविद्यालयाचे कनिष्ठ महाविद्यालय एस. टी. मेहता ज्युनियर कॉलेज येथील विद्यार्थिनींनी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले आहे. २०२४ मधील उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत ९७७ विद्यार्थिनी प्रविष्ठ झाल्या होत्या. त्यापैकी ७९२ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ८१.०६% लागला आहे. विज्ञान शाखेतून ११३ विद्यार्थिनींपैकी १०० विद्यार्थिनी उत्तीर्ण होऊन विज्ञान विभागाचा निकाल ८८.२९ % लागला आहे. वाणिज्य विभागातून ४९४ विद्यार्थिनींपैकी ४६३ विद्यार्थिनी उत्तीर्ण होऊन वाणिज्य विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे ९३.७२ % लागला आहे. कला विभागातून ३७० पैकी २२९ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत आणि कला विभागाचा निकाल ६१.८९% लागला आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आशा मेनन यांनी विद्यार्थिनींच्या या यशाचे भरभरून कौतुक केले आहे.
……
शाळा मार्गावरील विजेच्या तारेचा धोका
चेंबूर (बातमीदार) : गोवंडी येथील देवनार गावाजवळील कुमुद विद्या मंदिर शाळेसमोरील मार्गावर विद्युत तार लोंबकळत आहे. यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसह रहिवाशांना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे. गोवंडी येथील देवनार गावाशेजारी कुमुद विद्या मंदिर शाळा आहे. या शाळेच्या मार्गावर विद्युत खांब आहे. विद्युत खांबावरील विद्युत तार कित्येक दिवसांपासून लोंबकळत आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवासी व शाळेतील विद्यार्थ्यांना विजेचा धक्का लागण्याची दाट शक्यता आहे.
……
चेंबूर : कुमुद विद्या मंदिर शाळेसमोरील मार्गावर विजेची तार लोंबकळत आहे.
……

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑक्सफर्डनं मागितली उदयनराजेंची माफी, जेम्स लेनच्या पुस्तकात पडताळणी न करता मजकूर छापल्याचं केलं मान्य

Steve Smith ची गाडीही सुस्साट...! शतक ठोकत द्रविडला टाकलं मागे; Ashes मध्ये फक्त ब्रॅडमनच पुढे

Latest Marathi News Live Update : 'जो देईल तुम्हाला नोट, त्याला करू नका वोट' मतदानाबाबत जनजागृतीसाठी भव्य मानवी साखळी

प्रेक्षकांना कसा वाटला 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले'चा पहिला भाग? नेटकरी म्हणतात- एकच विनंती आहे...

जगण्याचा अधिकार कायद्यापेक्षा मोठा नाही, उमर खालिद, शर्जील इमामच्या जामीन याचिकेवर सुप्रीम कोर्टाची टिप्पणी

SCROLL FOR NEXT