मुंबई

महावितरणच्या ३४१ ठिकाणांवर स्मार्ट मीटर

CD

मुंबई, ता. १ : वीजग्राहकांच्या मासिक बिलात पारदर्शकता व अचूकतेसाठी महावितरणने राज्यात स्मार्ट मीटर बसवण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार महावितरणची १८ कार्यालये आणि कर्मचारी निवासाच्या ३२३ सदनिकांमध्ये ३४१ स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत.
वीजग्राहकांसाठी स्मार्ट मीटर बसवताना सर्वप्रथम महावितरणची कार्यालये आणि कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या निवासस्थानांमध्ये स्मार्ट मीटर बसवण्याच्या सूचना महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केल्या होत्या. त्यानुसार नागपूर शहरात ६०, गोंदियामध्ये १४६, वर्धा येथे ३०, भंडारा येथे १० आणि चंद्रपूरमध्ये ९५ अशा एकूण ३४१ वीजग्राहकांसाठी स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत. केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाच्या आधारे राज्यात कृषी ग्राहक वगळता सर्व ग्राहकांच्या कार्यालये अथवा निवासस्थानी स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहेत. त्यासाठीचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित मीटरमुळे विजेची अचूक नोंद होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शिवसेनेच्या नगरसेवकावर अपात्रतेची टांगती तलवार, शिंदेंच्याच पदाधिकाऱ्याची हायकोर्टात याचिका

Chandoli Koyna Tiger Territory : चांदोली, कोयना जंगलात वाघांनी हद्दी केल्या फिक्स, तीन वाघांमध्ये कोणाची दादागिरी

Latest Marathi news Live Update : कोल्हापूरच्या पंचगंगा नदीत बुडणाऱ्या महिलेला पोलिसांनी वाचवले

Crime News : थरार केरळमधील शोधमोहिमेचा! बोईसरच्या चिमुकल्याला पोलिसांनी मृत्यूच्या दाढेतून नाही, तर पित्याच्या विळख्यातून सोडवले

Republic Day Weekend 2026: प्रजासत्ताक दिनी मुलांसोबत आउटिंगचा प्लॅन? पुण्यातील ‘या’ ठिकाणांना नक्की द्या भेट

SCROLL FOR NEXT