Bhiwandi Loksabha sakal
मुंबई

Bhiwandi Loksabha: आमदार किसन कथोरेंची हकालपट्टी करा, भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

कपिल पाटील यांना पराभूत करण्यासाठी मुरबाडचे भाजप आमदार किसन कथोरे यांनी त्यांच्या समर्थकांमार्फत प्रयत्न केले आहेत |

CD

BJP News: भाजपचे माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांना पराभूत करण्यासाठी आमदार किसन कथोरे यांनी प्रयत्न केल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. जगन्नाथ पाटील यांच्या पत्रामुळे ऐन लोकसभा निकालापूर्वी भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

जगन्नाथ पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना ३१ मे रोजी दिलेल्या पत्राच्या आशयात पक्षाचे अधिकृत उमेदवार कपिल पाटील यांना पराभूत करण्यासाठी मुरबाडचे भाजप आमदार किसन कथोरे यांनी त्यांच्या समर्थकांमार्फत प्रयत्न केले आहेत. त्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, असा उल्लेख करण्यात आला आहे.

चार-पाच महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्र्यांच्या सागर बंगल्यावर आपण स्वतः, रवींद्र चव्हाण, कपिल पाटील, किसन कथोरे यांच्यात बैठक झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यावेळी कपिल पाटील यांनी त्यांचे आक्षेप स्पष्टपणे मांडले; पण कथोरेंनी यावर कोणताही खुलासा केला नाही, असे पाटील यांनी पत्रात नमूद केले. सोबतच किसन कथोरे यांनी कपिल पाटील यांना पराभूत करण्यासाठी त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना आगरी समाजाची गावे आहेत, अशा ठिकाणी तुतारीला मतदान करा आणि जेथे कुणबी समाजाची गावे आहेत तेथे नीलेश सांबरे या अपक्ष उमेदवाराला मतदान करण्याची सक्त ताकीद केल्याचा आरोप केला.

कथोरे यांच्याविरोधात पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असून प्रचंड खदखद आपल्या निदर्शनात आल्याचे जगन्नाथ पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे किसन कथोरे यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जगन्नाथ पाटील यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : जानेवारीच्या पगारात 8व्या वेतन आयोगाची वाढ मिळेल का? किती वाढणार पगार? जाणून घ्या पगारवाढीबाबत मोठा अपडेट

मराठी अभिनेत्रीला लागली लॉटरी! नुकतीच सुरू झाली नवीन मालिका; आता चित्रपटही येणार, कोण आहे ती?

हो की नाही एवढंच बोला! मला बोलायचंय म्हणणाऱ्या वाल्मिक कराडला कोर्टानं फटकारलं; सुनावणीत काय घडलं?

Navneet Rana : मौलानाला चार बायका १९ मुलं, आता हिंदूंनीही ४ मुलं जन्माला घाला; भाजप नेत्या नवनीत राणांचं खळबळजनक विधान

रुग्णाला घेऊन जाणारं अमेरिकन नौदलाचं विमान कोसळलं; ५ जणांचा मृत्यू, तिघे बेपत्ता

SCROLL FOR NEXT