मुंबई

लोकसभा निवडणुकीत बांगलादेशींचेही मतदान

CD

लोकसभा निवडणुकीत बांगलादेशींचेही मतदान
एटीएसच्या कारवाईत माहिती उघड

मुंबई, ता. ११ : भारतात घुसखोरी केल्याबद्दल खटला सुरू असलेले बांगलादेशी नागरिकांनी लोकसभा निवडणुकीत मतदान केल्याची बाब समोर आली आहे. हे बांगलादेशी नागरिक मुंबईत रिक्षाचालक, इलेक्ट्रिशिअन, भाजीवाला म्हणून वावरत असल्याची धक्कादायक माहिती राज्य दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) तपासातून पुढे आली.

एटीएसच्या जुहू कक्षाने माहितीच्या आधारे एका बांगलादेशी घुसखोराला ताब्यात घेतले. या व्यक्तीला काही महिन्यांपूर्वीच घुसखोरीबद्दल मुंबईत अटक करण्यात आली होती, त्याच्याविरोधातील खटल्याचे कामकाज सुरू असून आरोप सिद्ध झाल्यानंतरच संबंधित घुसखोराला त्याच्या देशात धाडले जाते; मात्र त्यादरम्यान हे घुसखोर जामीन मिळवतात. बनावट कागदपत्रांआधारे भारताच्या कोणत्याही राज्यातील अधिवासाचे पुरावे तयार करतात, त्याआधारे पारपत्र मिळवतात आणि पुन्हा मुंबईसारख्या महानगरात पाय रोवतात, ही कार्यपद्धती या कारवाईच्या निमित्ताने ‘एटीएस’च्या तपासात उघड झाली. घुसखोरीबद्दल खटला सुरू असलेल्या मात्र मुंबईत पुन्हा स्थायिक झालेल्या सुमारे १० ते १२ जणांची नावे एटीएस अधिकाऱ्यांना मिळाली. त्यापैकी रियाझ शेख, सुलतान शेख, इब्राहिम शेख आणि फारुख शेख या चौघांना अटक करण्यात आली. तर अन्य घुसखोरांची शोधाशोध सुरू असल्याची माहिती ‘एटीएस’ने दिली. यापैकी रियाझ अंधेरी लोखंडवाला भागात वास्तव्यास असून परिसरात इलेक्ट्रिशिअन म्हणून परिचित आहे. सुलतान मालवणी येथे राहतो आणि रिक्षा चालवतो. तर इब्राहिम माहुल गाव येथे भाजी विक्रेता आहे. या चौघांनीही यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदान केल्याची माहिती पुढे येत आहे.

.....
भारतीय पारपत्र मिळविण्यासाठी प्रयत्न
आशिया खंडातील अन्य देशांच्या मानाने भारतीय कुशल-अकुशल मजुरांना परदेशात अधिक मागणी आहे. हे लक्षात घेत बांगलादेशी घुसखोर भारताचे पारपत्र मिळविण्यासाठी प्रयत्न करतात. या कारवाईत नावे समोर आलेल्यांपैकी बहुतांश घुसखोर भारतीय पारपत्रावर परदेशात नोकरीनिमित्त गेल्याची माहिती एटीएसला मिळाली. भविष्यात बनावट पारपत्राआधारे परदेशात गेलेल्या बांगलादेशी घुसखोराने अनुचित कृत्य घडवल्यास किंवा अशा कृतीत सहभाग घेतल्यास जबाबदारी भारतावर येऊ शकेल, अशी चिंता एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानी खेळाडूने भारताची जर्सी घातली, तिरंगाही खांद्यावर घेतला; देशाच्या बोर्डाकडून झाली मोठी कारवाई

Mangesh Kalokhe: हत्येप्रकरणी आरोप असलेले Sudhakar Ghare यांचा मोठा खुलासा, Mahendra Thorve वर आरोप | Sakal News

Healthy Resolutions 2026: 2026 मध्ये निरोगी आणि ताजेतवाने राहण्यासाठी आजच डायरीत नोट करा हे ५ सोपे पण पॉवरफुल रिझोल्यूशन्स

Latest Marathi News Live Update : चंद्रपूर महापालिका संदर्भात नागपुरातील भाजप कार्यालयात बैठक सुरू

Liver Health : चिकन की मटण..काय खाल्ल्याने लिव्हर हळूहळू खराब होते? किती प्रमाणात खावे अन् कधी टाळावे, जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT