मुंबई

विरारमध्ये १८ सदनिकांची ४२ ग्राहकांना विक्री

CD

विरार, ता. २ (बातमीदार) : बोळिंज येथील वाय. के. नगरमधील नव्याने विकसित केलेल्या ‘स्वप्नगंधा अपार्टमेंट`मधील १८ सदनिका तब्बल ४२ ग्राहकांना विक्री करून विकसकांनी ग्राहकांना पावणेदहा कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी फिर्यादी अबेल मायकल डिमेलो यांच्या तक्रारीनंतर अर्नाळा सागरी पोलिस ठाण्यात हेमंत पाटील व जयेंद्र पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय पांडुरंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नीलेश पुरभे करत आहेत.

मौजे बोळिंज येथील सर्व्हे क्रमांक ३४७/०५ ही जमीन जगदीश भोईर व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर होती. या जागेचा विकास करण्यासाठी विकसक हेमंत पाटील व जयेंद्र पाटील यांनी २०११ मध्ये त्यांच्याशी विकसन करारनामा केला होता. वसई-विरार शहर महापालिकेकडून बांधकाम परवानगी मिळवून विकसकांनी या जागेवर ‘स्वप्नगंधा अपार्टमेंट` या नावाने सात मजल्याच्या दोन इमारती मिळून एकूण ८४ रहिवासी सदनिकांचे बांधकाम केले होते; मात्र या इमारतीतील सदनिकांची विक्री करताना हेमंत पाटील व जयेंद्र पाटील यांनी या इमारतीतील १८ सदनिकांची ४२ वेगवेगळ्या ग्राहकांना विक्री करून ग्राहकांना तब्बल पावणेदहा कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

स्वप्नगंधा अपार्टमेंट इमारत क्रमांक दोनमधील ०१ क्रमांकाची सदनिका पाटील यांनी शकुंतला भोईर, निर्मल वसईकर, प्रतीक पांडे, प्रभाकर हरेर अशा चार वेगवेगळ्या ग्राहकांना विकलेली आहे; तर दुसऱ्या मजल्यावरील २०५ क्रमांकाची सदनिका शकुंतला भोईर, अबेल डीमेलो व चंदू रावल अशा तीन वेगवेगळ्या ग्राहकांना विकली आहे. याच मजल्यावरील २०६ क्रमांकाची सदनिका शकुंतला भोईर, वेल कुमार थंगवेलु, निर्मल जोसेफ वसईकर अशा तीन वेगवेगळ्या ग्राहकांना विकल्याचे निदर्शनास आले आहे. तिसऱ्या मजल्यावरील ३०५ क्रमांकाची सदनिका हेमंत पाटील यांनी प्रकाश चंद्र सोनी, मनोज कुमार पांडे व योगेश कुंदन सुतार अशा तीन वेगवेगळ्या ग्राहकांना विकली आहे. याव्यतिरिक्त याच इमारतीतील ४०२, ५०६, ६०१, ६०६, ७०२, ७०३, ७०५ आणि ७०६ या क्रमांकाच्या सदनिका दोन वेगवेगळ्या ग्राहकांना विकल्या आहेत. याबाबत फिर्यादी अबेल डिमेलो यांच्या तक्रारीनंतर अर्नाळा सागरी पोलिस ठाण्यात हेमंत पाटील व जयेंद्र पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.


जेठवा आणि डिमेलो या फिर्यादींच्या तक्रारीनंतर ‘स्वप्नगंधा अपार्टमेंट`मधील फसवणूक प्रकरणात हेमंत पाटील व जयेंद्र पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे; तर याच इमारतीशेजारील ‘चैतन्य अपार्टमेंट`मधील फसवणूक प्रकरणात नॅनड्रिना गोन्साल्विस यांच्या तक्रारीनंतर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित विकसकांनी जामिनासाठी अर्ज केलेला आहे; परंतु गुन्ह्याची तीव्रता लक्षात घेता त्यांना जामीन मिळू नये, यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
- विजय पाटील, पोलिस निरीक्षक, अर्नाळा पोलिस ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police: पुण्यात पोलिसांचा धाक उरलाय की नाही? मद्यपींकडून पोलिसांनाच धक्काबुक्की

Latest Marathi News Live Update : सदोष मतदार याद्यांवर निवडणूक घेणं ही आयोगाची करप्ट प्रॅक्टीस - उद्धव ठाकरे

Air India Flight: दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात अचानक बिघाड; मंगोलियात इमर्जन्सी लँडिंग

Women's World Cup: पाकिस्तानची जर्सी घालून भारतीय संघाला वर्ल्ड कप जिंकण्यासाठी फुल सपोर्ट; चाहत्याचा Video Viral

Mumbai Airport: महत्त्वाची बातमी! मुंबई विमानतळाच्या दोन्ही धावपट्ट्या बंद राहणार; का अन् कधी? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT