मुंबई

मुंबईत दोनशे खाटांचे पशुवैद्यकीय रुग्णालय

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : शहराच्या मध्यभागी महालक्ष्मी येथे अत्याधुनिक पशुवैद्यकीय रुग्णालय टाटा ट्रस्टने सुरू केले आहे. ९८ हजार चौरस फूट क्षेत्रफळातील पाच मजली इमारतीत २०० खाटांची क्षमता असलेले देशातील हे पहिले रुग्णालय आहे.
पाळीव प्राण्यांच्या देखभालीसाठीची ‘टाटा ट्रस्ट’ ही पहिलीच संस्था आहे. रुग्णालय प्रशासनाने मुख्य सेवा व डेमो ऑपरेशन्स अशा पहिल्या चाचणी टप्प्याचा भाग म्हणून ही सुविधा सुरू केली आहे. या रुग्णालयात आपत्कालीन रूम, प्राथमिक तपासणी आणि कन्सल्टेशन, इन-पेशंट देखभाल, डर्मेटोलॉजी, कार्डिओलॉजी आणि रेडिओलॉजी यासह एमआरआय, सीटी, अल्ट्रासोनोग्राफी आणि इतर लॅबोरेटरी अशा सेवांचा समावेश आहे; तर पुढच्या टप्प्यात रुग्णालयात ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया सुरू केल्या जाणार आहेत, पण यासाठी रुग्णालयाच्या वेबसाईटवरील व्हॉट्सॲपवर संदेश पाठवून, तसेच दुरध्वनी क्रमांकावर उपचारासाठी पूर्व नोंदणी करणे बंधनकारक आहे. तसेच आपत्कालीन मदतीसाठी विशिष्ट क्रमांक देण्यात आला आहे.
-------------------------
ुरुग्णालयाची वैशिष्ट्ये
- प्रत्येक पाळीव प्राण्याला उपचारासाठी योग्य वेळ आणि लक्ष देण्यासाठी विशिष्ट गरजांनुसार एक टीम नेमण्यात आली आहे. डॉक्टर्स, परिचारिका, तंत्रज्ञ आणि पाळीव प्राण्यांच्या देखभालीतील मदतनीसांच्या तज्ज्ञ टीमद्वारे या सेवेचा पुढचा टप्पा सुरू केला जाणार आहे. तसेच प्रतीक्षा कालावधी कमी राहील, असे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
- उपचारासाठी दैनंदिन संख्या मर्यादित असल्याने प्रत्येक पाळीव प्राण्याकडे स्वतंत्रपणे लक्ष पुरवले जाणार आहे. पूर्व नियोजित वेळ घेतली नसल्यास प्रतीक्षा कालावधीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच रुग्णालय प्रशासनाने ठरवलेल्या दरानुसार पैसे मोजावे लागणार आहेत.
------------------------------
प्रत्येक पाळीव प्राण्याला सर्वोत्तम दर्जाची सुविधा देण्यात येणार आहे. त्यासाठीची सर्व काळजी घेण्यात आलेली आहे.
- डॉ. थॉमस हीथकोट, प्रमुख व्हेटेरीनरी ऑफिसर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! मनसेचे दोन उमेदवार बेपत्ता, राज ठाकरे पोलिसांच्या संपर्कात, नेमकं काय घडतंय?

Shiv sena Pune Election: पुण्यात शिवसेनेची युती तुटली? १२३ जागांवर पक्ष स्वतंत्र लढणार? पडद्यामागे काय घडलं?

Sangli Election : ‘माघार घे, तुला कॉप्ट करतो! ’महापालिका निवडणुकीत नेत्यांचे नवे गाजर; सांगलीत ‘स्वीकृत’ राजकारण चर्चेत

Latest Marathi News Live Update : पुण्यात भाजपचा पहिला उमेदवार बिनविरोध

धक्कादायक! नववर्षानिमित्त मिठाई देण्यासाठी घरी बोलावलं अन् प्रेयसीनं चाकूनं प्रियकराचं गुप्तांगच कापलं, मुंबईत काय घडलं?

SCROLL FOR NEXT