मुंबई

मुसळधार पावसामुळे कार्यालये सुनी सुनी

CD

मुसळधार पावसामुळे कार्यालये सुनीसुनी
रेल्वे-रस्ता बंदचा फटका, ३० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती

सकाळ वृत्तसेवा
मुंबादेवी, ता. ८ (बातमीदार) : पावसाच्या संततधारेमुळे उपगरातून मुंबईकडे येणाऱ्या रेल्वे मार्ग तसेच रस्ता मार्गांवर पाणी साचल्यामुळे सोमवारी (ता. ८) सकाळपासूनच वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. रेल्वे रुळावर पाणी भरल्याने आणि मार्ग दिसण्यास समस्या येत असल्याने रेल्वेगाड्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे अप-डाऊन लोकल खोळंबल्या होत्या, तर कुर्ला, चेंबूर, हिंदमाता, लालबाग आणि परळच्या काही भागातही पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती.
ठाणे, कल्याण, अंबरनाथ, टिटवाळा, बदलापूर, कसारा आणि कर्जतकडून मुंबईनगरीत दररोज येणाऱ्या चाकरमानी, व्यापारी आणि छोट्या-मोठ्या व्यावसायिक, उद्योजकांना आपले आजचे व्यवहार ठप्प ठेवावे लागले.
दक्षिण मुंबईतील पालिका विभाग कार्यालये, बँक, विमा, महामंडळे आणि खासगी आस्थापनांमध्येही अधिकारी आणि कर्मचारीवर्गाची उपस्थिती अवघी ३० ते ३५ टक्के असल्याचे दिसून आले.
बी विभागात कार्यरत असणारे सुरक्षारक्षक प्रदीप कुंभार यांना त्यांच्या उलवा (बेलापूर) घरापासून बी विभाग, डोंगरी येथे येण्यासाठी पावसामुळे चार तास लागल्याचे त्यांनी सांगितले.
जेजे, भेंडीबाजार, मुसाफिर खाना, क्रॉफर्ड मार्केट, मनीष मार्केट, डोंगरी, चारनळ, नळ बाजार, भुलेश्वर, चिरा बाजार, कुंभारवाडा स्टील मार्केट, मेट्रो सिनेमा परिसरात ग्राहकसंख्या रोडावल्याने व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. तर आजच्या पावसामुळे मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांना दुपारनंतर सुट्टी देण्यात आली.
पालिका कार्यालयातील कर्मचारीवर्गाच्या अनुपस्थितीमुळे आरोग्य विभागात जन्म, मृत्यू दाखला आणि विवाह नोंदणी प्रमाणपत्र काढण्यासाठी आलेल्यांनाही मागे फिरावे लागले.
भुलेश्वर काशी मंदिर, मुंबादेवी मंदिर, बाबुलनाथ शिवमंदिर आणि महालक्ष्मी मंदिरात पावसामुळे भाविकांची गर्दी नसल्याने देवदर्शनाला आलेल्या भाविकांना अगदी शांतपणे देवीचे दर्शन घेता आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat HC: Zoom मीटिंग नाही कोर्ट आहे! शौचालयातू सुनावणीला हजर राहून फसला, कोर्टाने ठोठावली शिक्षा... पोटासह खिसाही रिकामा

Pune Railway Station: पुणे स्थानकावर ‘ब्लॅक बॉक्स’ सारखी यंत्रणा; व्यवस्थापक, चालक यांच्या संभाषणाचे होणार रेकॉर्डिंग

Satara Fraud:'साताऱ्यातील एकाची ४३ लाखांची फसवणूक'; पाच जणांवर गुन्हा दाखल,वाळू ठेका देण्याचे दाखवले आमिष

Ashadhi Wari:'माउलींच्या पालखीचे लोणंदमध्ये स्वागत'; दर्शनासाठी भाविकांची गर्दी; निरोप देताना अनेकांचे पाणावले डोळे

Fauja Singh : जगप्रसिद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी अपघाती निधन, रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाची धडक

SCROLL FOR NEXT