Maharashtra rain update rain forecast orange yellow alert monsoon weather eSakal
मुंबई

Maharashtra Rain Updates: आगामी तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा, शेतकऱ्यांनी अशी घ्यावी काळजी

Monsoon Alert : जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने १ जुलै रोजी वर्तविला होता.

सकाळ वृत्तसेवा

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. परिणामी, पश्चिमी वाऱ्यांचा जोर वाढल्याने महाराष्ट्राच्या काही भागात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच, अरबी समुद्रसपाटीपासून दक्षिण गुजरात-उत्तर केरळ किनारपट्टीवरही कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे, त्यामुळे संपूर्ण कोकण आणि लगतच्या घाटात तुरळक ठिकाणी जोरदार ते अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पालघर जिल्ह्यातही शुक्रवारी (ता. १९) सतर्कतेचा इशारा देत काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. २० ते २२ जुलैदरम्यानही तुरळक ठिकाणी पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने १ जुलै रोजी वर्तविला होता. महावेधच्या आकडेवारीनुसार, पालघर जिल्ह्याचा १ ते १८ जुलैपर्यंत सरासरी पाऊस ५२५.५ मिमी आहे, तर यावर्षी ५५२.५ मिमी (१०५.१ टक्के) पावसाची नोंद झाली आहे, अशी माहिती कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल येथील कृषी हवामान शास्त्रज्ञ रिझवाना सय्यद यांनी दिली.

मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचल्याने प्रामुख्याने शहरांमधील वाहतूक विस्कळित होऊ शकते. ज्या भागात पाणी साचण्याची समस्या वारंवार भेडसावते त्या भागात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ग्रामीण भागात कच्चे रस्ते व घरांचे नुकसान होण्याची शक्यता असते. अतिजोरदार पावसामुळे काही भागात बागायती व नवीन पिकांचे नुकसान होण्याचे टाळता येणार नाही, तसेच काही नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात नदीला पूर येऊ शकतो.

शेतकऱ्यांनी भातलावणी झाली असल्यास भातशेतातील अतिरिक्त साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी खोल चर करून घ्यावे. औषध फवारणी व खते देण्याची कामे पुढे ढकलावीत, भाताची पुनर्लागवड, फळझाडे व भाजीपाल्याची नवीन लागवड करणे टाळावे. जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करावी, असा सल्ला कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल येथील प्रमुख डॉ. विलास जाधव यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाची तीव्र प्रतिक्रिया

Video Viral: हृदयस्पर्शी! घाबरलेल्या हत्तीच्या पिल्लाची माणसांकडे धाव, व्हायरल व्हिडिओने वेधले लक्ष

ENG vs IND: जो रुटची विकेट 'बॉल ऑफ द सिरीज'! सचिन तेंडुलकरची शाबासकी; विराट कोहलीकडूनही गिलच्या पाठीवर कौतुकाची थाप

SCROLL FOR NEXT