Crime Against Women File Photo
मुंबई

Palghar News: आणखी एका चिमुरडीवर अत्याचार; पालघरमध्ये वडिलांचा मित्रच निघाला नराधम

Bordi Crime News तीन वर्षांच्या पीडित मुलीच्या वडिलांची आणि आरोपीची मैत्री होती. आरोपी नेहमी मुलीच्या वडिलांना भेटायला येत होता.

सकाळ वृत्तसेवा

Palghar Crime News

बोर्डी : राज्याच्या सीमेलगत असलेल्या दक्षिण गुजरातमधील उंबरगाव औद्योगिक वसाहतीच्या गांधीवाडी निवासी वसाहतीत एका तीन वर्षीय चिमुकलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली. त्यामुळे याठिकाणी तणावाचे वातावरण आहे. ही घटना मंगळवारी (ता. २७) दुपारच्या सुमारास घडली.

पीडित मुलीच्या वडिलांची आणि आरोपीची मैत्री होती. आरोपी नेहमी मुलीच्या वडिलांना भेटायला येत होता. मंगळवार (ता. २७) दुपारच्या वेळी आरोपी मुलीच्या घरी गेला असता मुलीचे आई-वडील घरी नसल्याची संधी साधत त्याने मुलीवर अत्याचार केले. चिमुरडीवर झालेल्या या घटनेची माहिती परिसरात पसरताच संतप्त जमावाने उंबरगाव पोलिस ठाण्यात धाव घेत आरोपीला फाशी देण्याची मागणी केली. दरम्यान, फरार झालेला आरोपीला मोबाईल लोकेशनवरून पालघर येथून अटक करण्यात आली. उंबरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमण पाटकर यांनी ग्रामस्थांना या विषयावर शांतता अबाधित राहील, यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत बलसाड जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. करणराज वाघेला यांनी आरोपीला पकडण्यासाठी तातडीची पावले उचलल्यामुळे आरोपी पोलिसांच्या हाती लागला.

घटनेच्‍या निषेधार्थ बंद
उंबरगावमधील बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेवरून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. परिसरातील विविध सामाजिक संघटनांनी या घटनेचा निषेध केला. या घटनेच्‍या निषेधार्थ बुधवारी (ता. २८) उंबरगाव व्यापारी संकुले, तसेच औद्योगिक वसाहतीत बंदचे आवाहन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर औद्योगिक वसाहतीतील कारखाने, तसेच उंबरगाव तालुक्यातील दुकाने व व्यापारी, उद्योग स्वेच्छेने बंद करून या घटनेचा निषेध करण्यात आला. उंबरगाव, गांधीवाडी परिसरात जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

Mumbai Politics: शिंदेसेनेचा राजकीय गाफीलपणा, चालकांचा जीव धोक्यात; पलावा पूल प्रकरण तापलं

Latest Maharashtra News Updates : मोतीलाल नगर वसाहतीचा पुनर्विकास करताना म्हाडाला बांधकाम करून मिळणार

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

SCROLL FOR NEXT