मुंबई

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर धुळीचे साम्राज्य, प्रवासी बेहाल

चिखलातून मार्ग काढताना दुचाकी वाहने घसरून अपघाताच्‍या घटना वाढल्या आहेत.

CD

गणेशोत्सवानंतर मुंबई-गोवा महामार्गाचे काँक्रीटीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या कामामुळे महामार्गावर सध्या धुळीचे साम्राज्य पसरले आहे. कोलाड बाजारपेठ ते तळवली गावापर्यंत अनेक ठिकाणी काम सुरू असल्याने या धुळीमुळे वाहनचालकांसह नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

धुळीचा त्रास होऊ नये म्हणून पाण्याची फवारणी केली जात आहे. या फवारणीमुळे मात्र रस्त्यावर चिखल निर्माण झाला आहे. या चिखलातून मार्ग काढताना दुचाकी वाहने घसरून अपघाताच्‍या घटना वाढल्या आहेत.

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम १७ वर्षांपासून सुरू आहे. गणेशोत्सवानंतर या महामार्गाचे काम शीघ्रगतीने सुरू असले तरी या कामात कोणतेही नियोजन दिसून येत नाही. मुंबई-गोवा महामार्गावर कोलाडपासून खांबपर्यंत रस्ता काँक्रीटीकरण, उड्डाण पूल, छोटे- मोठे ब्रिज, गटाराचे काम विविध ठिकाणी सुरू आहे. असे असताना हे काम डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होईल, याची खात्री देता येत नसल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.

कोलाड बाजारपेठेत, तसेच तळवली येथील रस्त्यावर प्रचंड धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या धुळीमुळे प्रवासीवर्गाबरोबर स्थानिक व्यापारी व नागरिक बेजार झाले आहेत. तुफान वेगाने ये-जा करणाऱ्या वाहनांमुळे रस्त्यावरील धूळ व्यावसायिकांच्या दुकानात जाऊन मोठे नुकसान होत आहे. याला पर्याय म्हणून ठेकेदाराकडून रस्त्यावर पाणी मारले जात आहे, परंतु या पाण्यामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

तसेच दोन तासांनी परिस्थिती जैसे थे अशीच होते. त्यामुळे हजारो लिटर पाणीदेखील वाया जात आहे. शिवाय दुचाकींचे अपघातदेखील होत आहेत. त्‍यामुळे योग्य नियोजनानुसार या धुळीवर उपाययोजना करण्याची मागणी वाहनचालकांसह नागरिकांकडून करण्यात येत आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम १७ वर्षांपासून सुरू आहे. या महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे दररोज अपघात होऊन असंख्य प्रवाशांचा नाहक बळी जात आहे. शिवाय रस्‍त्‍यावर धूळ असल्यामुळे वाहनचालकांसह नागरिकांना याचा त्रास होत आहे.


चंद्रकांत लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते, कोलाड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

डिझेलचा भडका, एसटीच्या तिकीट दराचे काय? परिवहन मंत्री म्हणाले, महामंडळाला तोटा होतोय, सध्या...

Ambenali Accident: आंबेनळी ठरतोय मृत्यूचा घाट, ८ वर्षांपूर्वी झालेला ३३ जणांचा मृत्यू; गेल्या तीन महिन्यात तिसरी दुर्घटना

Supreme Court Dowry Harassment Ruling : सासरच्यांनी सुनेला जुळवून घेण्यास सांगितल्यास गुन्हा दाखल होणार? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश

Latest Marathi News Live Update : अर्जुन खोतकर यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट

Blackmail case: महिलेसोबतच्या व्हिडीओवरून ब्लॅकमेल, बँक कर्मचाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल; ६ जणांवर गुन्हा, चौघांना अटक

SCROLL FOR NEXT