सुधाकर वाघ ः सकाळ वृत्तसेवा
टोकावडे, ता. २२ ः केंद्र सरकारच्या पशुपालन व डेअरी विभाग तसेच राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने मुरबाडमध्ये फिरते पशुवैद्यकीय पथक अतिशय अल्पदरात सेवा देत असून दुर्गम भागांतील पशुपालकांसाठी हे पथक देवदूत ठरत आहे.
मुरबाड तालुक्यातील ग्रामीण भागातील पशुंवर योग्य वेळी उपचार व्हावा, यासाठी पशुवैद्यकीय पथकाचे एक वाहन कार्यान्वित करण्यात आले आहे. या फिरत्या पशुचिकित्सक पथकांमध्ये उपकरणांनी सुसज्ज वाहन, पशुवैद्यकीय अधिकारी- कर्मचारी आणि वाहनचालक तथा मदतनीस यांचा समावेश आहे. दुर्गम भागातील सर्व शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी दारात सेवा मिळावी, जनावरांचे लसीकरण करणे, कृत्रिम रेतन करणे, विविध योजनांचा प्रसार करणे व सुसंवर्धन शिबिरे आयोजन करणे, पशुधन वाचवणे हा फिरत्या दवाखान्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. या माध्यमातून मुरबाड तालुक्यामध्ये एप्रिल २०२४ पासून आतापर्यंत ४९५ पाळीव गाय, बैल, शेळी, म्हैस आदी जनावरांवर उपचार करण्यात आले आहेत.
---------------------------------------------------
टोल फ्री क्रमांकाची सुविधा
गरजू पशुपालकांनी दूरध्वनीवरून संपर्कासाठी १९६२ हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे. येथे नोंदवलेली तक्रार पशुसंवर्धन आयुक्तालयातील मध्यवर्ती कॉल सेंटरद्वारे जवळच्या फिरत्या पशु चिकित्सालयाकडे पाठवली जाते. उपचारासाठी विहित कालमर्यादाही तसेच रोग लक्षणांनुसार निश्चित करण्यात आले आहे. या माध्यमातून पशुपालकांना घरपोच सेवा मिळत आहे; पण याबाबतची जनजागृती करण्याची गरज आहे. या पथकात तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. संपत देशमुख, पद्माकर पवार, वाहनचालक फर्डे, पशुधन पर्यवेक्षक छगन मेंगाळ आदींची टीम काम करीत आहे.
-----------------------------------------
शेतकरी, पशुपालकांच्या दारात वैद्यकीय सेवा देण्यासाठी केंद्र शासनाने राज्याला फिरते पशुवैद्यकीय पथक वाहने दिली आहेत. या माध्यमातून प्राण्यांची अल्पदरात तपासणी, लसीकरण, औषधोपचार केले जातात.
- डॉ. स्वरूप चंदेल, पशुधन विकास अधिकारी (विस्तार), मुरबाड
----------------------------------------
केंद्र सरकारपुरस्कृत पशुस्वास्थ्य, पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत फिरत्या पशुचिकित्सा पथकांची स्थापना करण्यात आलेली आहे. या पथकामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना खूप फायदा होतो. आजपर्यंत ४९५ शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घेतला.
- डॉ. संपत देशमुख, फिरते पशुवैद्यकीय पथक
------------------------------------------
शेळी आजारी असल्याने १९६२ नंबरवर फोन केला होता. शासनाचे फिरते पथक तत्काळ उपलब्ध झाले. त्यांना मोफत उपचार केले.
- वैभव मेंगाळ, भोईरवाडी शेतकरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.