मुंबई

खैरणे रेल्वेस्थानकाची प्रतीक्षा अनुत्तरित

CD

वाशी, ता. १९ (बातमीदार) : नवी मुंबईतील ट्रान्सहार्बर मार्गावरील दिघा आणि खैरणे (बोनकोडे) रेल्वेस्थानकाच्या उभारणीसाठी १५ वर्षांपूर्वी माजी खासदार संजीव नाईक यांनी केंद्रीय रेल्वे विभागाकडे पाठपुरावा केला होता. त्यामुळे रेल्वेस्थानक करण्यासंदर्भात हालचालीदेखील सुरू झाल्या होत्या; मात्र अद्यापही बोनकोडे येथील रेल्वेस्थानक सुरू करण्यात आले नाही.
तत्कालीन खासदार राजन विचारे यांनी दिघा रेल्वेस्थानकाची उभारणी करण्यासाठी आपल्या कारकीर्दीत प्रयत्न केला व प्रत्यक्षात दिघा रेल्वेस्थानकाचे काम होऊन दोन वर्षांपूर्वी ते प्रवाशांसाठी ते खुले करण्यात आले आहे; पण त्या कालावधीत खैरणे रेल्वेस्थानकाला रेल्वेकडून हिरवा कंदील दिलेला असताना राजकीय रंगामुळे या रेल्वेस्थानकाचा प्रश्न रेंगाळला आहे. ठाणे-वाशी ट्रान्सहार्बर मार्गावर बोनकोडे आणि दिघा रेल्वेस्थानक उभारण्याची मागणी माजी खासदार संजीव नाईक यांनी त्यांच्या कारकीर्दीत करीत पाठपुरावा केला होता. त्यांच्या कारकीर्दीत दोन्ही रेल्वेस्थानक उभारणीला मंजुरी मिळाली होती; परंतु २०१४मधील लोकसभा निवडणुकीत संजीव नाईक पराभूत झाले. त्यानंतर निवडून आलेल्या शिवसेनेचे तत्कालीन खासदार राजन विचारे यांनी संजीव नाईक यांची कामे पुढे रेटण्याचा प्रयत्न केला. त्यातील दिघा रेल्वेस्थानकाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यासाठी राजन विचारे यांनी रेल्वेकडे पाठपुरावा करून कामाचा शुभारंभ करून त्याच्या कालावधीत त्यांचे लोकार्पणदेखील करण्यात आले.
------------------
गणेश नाईक यांच्याकडून पाठपुरावा सुरू
खैरणे रेल्वेस्थानक उभारण्याच्या प्रस्तावासाठी तत्कालीन खासदार राजन विचारे यांनी मागील १० वर्षांत पाठपुरावा न केल्याने बोनकोडे रेल्वेस्थानकाचा विषय अधांतरीच राहिला आहे. विद्यमान खासदार नरेश म्हस्के यांनीदेखील यासंदर्भात पाठपुरावा केला नाही. दिघा रेल्वेस्थानकाच्या लोकार्पणानंतर माजी खासदार संजीव नाईक यांनी रेल्वेमंत्र्यांकडे बोनकोडे रेल्वेस्थानक उभारण्यासंदर्भात मागणी केलेली आहे. आता गणेश नाईक मंत्री असल्यामुळे त्यांच्याकडूनदेखील ऐरोली विधानसभेतील असणारे खैरणे रेल्वेस्थानक उभे राहावे, यासाठी पाठपुरावा करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Updates: पुण्यात पहाटेपासून मुसळधार... सलग दोन तास कोसळला! मराठवाड्यात संकटाचा इशारा, काळजी घ्या...

Pune News: रस्ते, सोसायट्यांच्या नाका तोंडात पाणी, ओढे नाल्यांची वाट रोखल्याचा फटका

Latest Marathi News Live Update : धास्ती! शनिवार, रविवारी पुन्हा झोडपणार; सोलापूरसह २२ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून ‘रेड अलर्ट’

Nanded News: सरपंचचा अनोखा निषेध! निधीअभावी जिल्हा परिषदेसमोर चक्क सरणावर बसून बेमुदत धरणे आंदोलन

Buldhana Accident: भरधाव दुचाकीच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू; गावकऱ्यांचा केळवद पोलिस स्टेशनला घेराव

SCROLL FOR NEXT