मुंबई

मराठी भाषिक पंतप्रधानासाठी तामिळी नागरिकाचे महाराष्ट्र भ्रमण

CD

मराठी पंतप्रधान पदासाठी तमिळ भाषिकाचे महाराष्ट्र भ्रमण
राजीव डाके : सकाळ वृत्त सेवा
ठाणे शहर, ता. २१ : भारताचा आगामी पंतप्रधान मराठी माणूस व्हावा, यासाठी तमिळनाडूचे शिवा अय्यर नामक नागरिक महाराष्ट्रातील सर्व जिल्हे पिंजून काढणार आहे. शुक्रवारी (२०) त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयापासून या मोहिमेला सुरुवात केली आहे. ते ठाण्यातून शनिवारी पालघरला गेले. त्यानंतर नाशिक आणि पुढे राज्यातील उर्वरित सर्व जिल्ह्यांत जाऊन तेथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उभे राहणार आहेत. तसेच महाराष्ट्रातील मराठी माणसांना या मोहिमेत सामील करून घेत ही चळवळ दिल्लीपर्यंत पोहोचवणार आहेत.

महाराष्ट्र राज्याने अगणित वीरपुरुषांना जन्म दिला आहे. देशाला विकास, शिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानाची वाट दाखवली आहे. राज्याने देशाला शौर्याचे प्रतीक असलेले छत्रपती शिवाजी महाराज दिले आहेत. महिलांना शिक्षित करणाऱ्या सावित्रीमाई फुले आणि सामाजिक समता निर्माण करणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिले आहेत. असा हा देशाला मार्गदाता ठरलेला महाराष्ट्र पंतप्रधान पदापासून मात्र आजपर्यंत वंचित राहिलेला आहे. ही विद्वानांची भूमी असतानाही या भूमीला मराठी पंतप्रधान पदाचा उमेदवार, दावेदार मिळालेला नाही. म्हणूनच या देशाचा येणारा पंतप्रधान मराठीच असावा, असा आग्रह देशातील तमाम जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी शिवा कृष्णामूर्ती अय्यर या ज्येष्ठ नागरिकाने राज्यभरात फिरण्याची मोहीम सुरू केली आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशाच्या पंतप्रधान पदाची माळ अमराठी माणसांच्याच गळ्यात पडली आहे. महाराष्ट्र या पंतप्रधान पदासाठी पात्र नाही का, असा सवाल अय्यर यांनी उपस्थित केला आहे. जर खासदारांच्या संख्याबळाच्या आधारावर एखादे राज्य जर अनेकदा पंतप्रधान पद भूषवित असेल तर हे इतर राज्यांसाठी योग्य नाही. त्यामुळे महाराष्ट्रासारख्या जागतिक नकाशावरील विकसित राज्यावर तो अन्याय आहे, असे अय्यर म्हणतात.

शिवा अय्यर हे ५० वर्षांपासून डोंबिवलीत राहतात. महाराष्ट्र ही त्यांची कर्मभूमी आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या हितासाठी पहिले ‘जय महाराष्ट्र’ त्यानंतर सर्व काही असा मराठी बाणादेखील त्यांनी बोलून दाखवला. अय्यर यांनी शुक्रवारी (ता. २०) ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयापासून मराठी भाषिक पंतप्रधान या मोहिमेला सुरुवात केली आहे. हातात छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले आणि संविधाननिर्माते, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा असलेले बॅनर घेत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य द्वारावर उभे राहिले होते. त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या अधिकारी, नागरिकांसोबत या विषयावर संवाद साधून या मोहिमेला पाठिंबा आहे का, असा सवाल करीत होते.

नाना पाटेकर यांना पसंती
महाराष्ट्रातील मराठी भाषिक पंतप्रधान कोण असावा, असे अय्यर यांना विचारले असता नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान झाले तरी चालतील; परंतु नाना पाटेकर यांच्यासारखी व्यक्ती या पदावर बसवली तर दिल्लीत जे अरविंद केजरीवाल यांनी करून दाखवले ते काम नाना पाटेकर महाराष्ट्रात, देशात करून दाखवू शकतात, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. गुजरातला चार वेळा, तर उत्तर प्रदेशाला ११ वेळा पंतप्रधानपद मिळाले. आता रोटेशन पद्धतीने महाराष्ट्राला हे पद मिळाले पाहिजे.

फोटो : ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठी भाषिक पंतप्रधान पदासाठी जनजागृती करताना शिवा अय्यर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शाळा ५ किमी अंतरावर असेल तर विद्यार्थ्याला ६००० रुपये मिळणार, सरकारची मोठी घोषणा, योजनेचा लाभ कसा मिळवायचा?

Mhada Lottery: म्हाडाला लागणार घरांची लाॅटरी, सर्वसामान्य मुंबईकरांचं होणार स्वप्नपूर्ण; पहा कधी निघणार सोडत?

Pune News : वेश्याव्यवसायास नकार दिल्याने बांगलादेशी अल्पवयीन मुलीला कोंडून मारहाण

Bangladesh Hindu AttacK: हिंदू व्यापाऱ्याला बेदम मारहाण, जीव गेल्यावर मृतदेहावर नाचले हल्लेखोर; बांग्लादेशातील अराजकता थांबेना

Pune Crime : हडपसर, वाकडेवाडी परिसरात अमली पदार्थ जप्त, पाच जणांना अटक

SCROLL FOR NEXT