मुंबई

अंबरनाथमध्ये आरोग्य केंद्राकडून योग धडे

CD

अंबरनाथ, ता. २२ (वार्ताहर) : अंबरनाथमध्ये आपले आरोग्य केंद्राच्या वतीने योग दिवस मोठ्या उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला. साधारण पन्नाशीच्या वयातील ३५ ते ४० महिला पंधरा वर्षांपासून सातत्याने योग करत आहेत. आपल्या निरोगी आरोग्यासाठी आणि तणावमुक्त जीवनासाठी रोज एक तास महिला योगासने करत आहे. या महिलांचा भाजप महिला कार्यकर्त्यांनी प्रमाणपत्र देऊन सन्मान केला.
अंबरनाथ पूर्वेच्या कै. शांताराम जाधव सभागृहात शुक्रवारी आपले आरोग्य केंद्राच्या वतीने एक दिवस आधीच योग दिवस साजरा करण्यात आला. १५ वर्षांपासून हे केंद्र सुरू असून, ३५ ते ४० महिला नित्यनियमाने येथे योगासने करत आहेत. अतिशय धकाधकीच्या जीवनात निरोगी आरोग्यासाठी आणि तणावमुक्त राहण्यासाठी ‘आपले आरोग्य’ या योगा केंद्राची स्थापना इंदू पाताडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यामध्ये नोकरदार महिलांचा मोठा सहभाग असून, सकाळी सात ते आठ असे रोज एक तास नित्यनियमाने सूर्यनमस्कार, प्राणायाम, मेडिटेशन घेण्यात येते. त्याचबरोबर हात, पाय, कंबर, मान, पाठ, गुडघे यासाठी विविध आसने घेतली जातात. योग दिनानिमित्ताने अनेक मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात आली. याप्रसंगी महिलांनी ‘हे नाम रे’ या गाण्याच्या तालावर योगासन केली. यातील अनेक महिला ६० ते ७० वर्षांच्या असून, अगदी या वयातही पायी प्रवास करत आहेत. त्यामुळे वयोमानानुसार हात, पाय, गुडघेदुखी, पाठ, मान अशी दुखणी कमी प्रमाणात महिलांमध्ये आढळून येत आहेत. आपल्या निरोगी आरोग्यासाठी नियमित योगासने करा आणि तंदुरुस्त राहा, असा सल्ला योगगुरू इंदू पाताडे यांनी उपस्थित महिलांना दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडिलांवर अंत्यसंस्कारानंतर अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर, घरचं दु:ख मागे सारून लोकांचे अश्रू पुसले

Nagpur: निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना दिला धीर

Latest Marathi News Live Update : पुणे, मुंबई, मराठवाड्यासह राज्यातील सर्व जिल्ह्यांतील पावसाचा जोर होणार कमी

Ujani Dam: 'मुसळधार पावसामुळे चंद्रभागेने गाठली इशारा पातळी'; उजनीतून १ लाख १५ हजारांचा विसर्ग; नदीकाठी पूरस्थिती कायम

Supreme Court: गंभीर दुखापतीच्या उद्देशाने केलेली कृती क्रूरता; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण

SCROLL FOR NEXT