मुंबई

महायुतीत लढलो तरी सत्ता भाजपची

CD

भिवंडी, ता. २४ (वार्ताहर)ः ठाणे जिल्ह्यात भाजप क्रमांक एकचा पक्ष असल्याचे विरोधकांसह मित्रपक्ष मान्य करतात. त्यामुळे महायुती म्हणून निवडणुका लढलो तरी सत्ता भाजपची असली पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांसाठी राबवलेल्या बहुतांश योजना ग्रामविकास मंत्रालय राबवीत आहे. राज्यातील घरकुल योजनांचा लाभ जिल्ह्यातील २० हजार कुटुंबीयांना मिळणार आहे. तर लखपती दीदी योजनेचा लाभ बचत गटांना मिळत आहे. या योजना ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे, असे जयकुमार गोरे म्हणाले. भाजपच्या ठाणे जिल्हा ग्रामीणच्या वतीने आयोजित कार्यकर्ता संवाद बैठकीत ते बोलत होते. या वेळी कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम केल्यास निवडणुकांमध्ये यश नक्की मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या बैठकीत माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार किसान कथोरे, विधान परिषद सदस्य आमदार निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, माजी आमदार पांडुरंग बरोरा, जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाकी, रामभाऊ पातकर, महिला जिल्हाध्यक्षा शीतल तोंडलीकर, सरचिटणीस संभाजी शिंदे उपस्थित होते.
--------------------------------------------------
कथोरे-पाटील वाद कायम
येणाऱ्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत. त्यासाठी ग्रामविकास मंत्री यांनी घेतलेल्या निर्णयामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ मिळणार असल्याचे प्रतिपादन आमदार किसन कथोरे यांनी केले, तर जिल्हा नियोजन समितीमध्ये भाजप कार्यकर्त्यांना कमी निधी दिला जातो, अशी खंत व्यक्त करताना कपिल पाटील यांनी कथोरे यांनी भिवंडीवर अधिक लक्ष देण्याची गरज व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI MPC Updates: आरबीआयने सर्वसामान्यांना दिला मोठा धक्का; सणासुदीच्या काळात कर्जाचा EMI कमी होणार नाही

Video: पुण्यात गौतमी पाटीलच्या गाडीचा अपघात, नवले पूलाजवळ घडली घटना, रिक्षाला उडवलं

DMart कोणत्या सेक्शनमधून सर्वाधिक पैसे कमावतो? किराणा, कपडे की इतर...

Smart Goggle: दृष्टिहीनांचे जगणे होणार सुसह्य; पांढऱ्या काठीच्या जागी आता स्मार्ट गॉगल

INDU19 vs AUSU19 : १७ चेंडूंत ८४ धावा ! वैभव सूर्यवंशीचे ऑस्ट्रेलियात कसोटीत वेगवान शतक; ब्रेंडन मॅक्युलमच्या विक्रमाशी बरोबरी

SCROLL FOR NEXT