मुंबई

पुण्यातील स्पर्धेत ठाण्याचा दबदबा

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २४ : महाराष्ट्र राज्य वरिष्ठ अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत ठाणे महापालिका प्रशिक्षण योजनेअंर्तगत सराव करणाऱ्या खेळाडूंनी ११ पदकांची लयलूट केली आहे. यामध्ये ६ सुवर्णपदकांसह तीन रौप्य आणि दोन कांस्यपदकांचा समावेश आहे. बालेवाडी येथे २१ ते २३ जून कालावधीत ही स्पर्धा पार झाली होती.
या स्पर्धेत निखिल ढाकेने ४०० मीटर रिलेमध्ये सुवर्णपदक, १०० मीटर रिलेमध्ये रौप्य तसेच २०० मीटरमध्ये कांस्यपदक जिंकले. श्रेष्ठा शेट्टीने लांब उडीमध्ये कांस्यपदक आणि रिलेमध्ये सुवर्णपदक जिंकले. अली शेखने रिलेमध्ये सुवर्णपदक आणि रौप्यपदक जिंकले, तर गिरिक बंगेराने रिलेमध्ये सुवर्णपदक जिंकले. लीना धुरीने सुवर्णपदक जिंकले, तर हर्ष राऊतने रिलेमध्ये रौप्यपदक जिंकले. या वेळी खेळाडूंनी हंगामाची सुरुवात चांगली केली असून, आणखी सुधारणा केली जाईल, असे प्रशिक्षक नीलेश पाटकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: पत्नीचं दिरासोबत सूत जुळलं, नंतर लग्नही केलं, पण पतीचा पारा चढला, रागात सासूसोबत नको ते करून बसला

पल्स पोलिओची ॲम्बेसेडर ते फाउंडेशनची स्थापना, फक्त अभिनय नाही समाजकार्यातही पुढे आहे ऐश्वर्या राय, अभिनेत्रीबद्दल या गोष्टी माहीत आहेत का?

मराठी मालिकेची परदेशात हवा, न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरवर झळकली कमळी, व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : गोदावरी नदीवर नवा रामसेतू पूल बांधणार- गिरीश महाजन

Thane News: भंडाराचं जेवण खायला गेला पण तिथेच...; डोंबिवलीत १३ वर्षीय आयुषसोबत नेमकं काय घडलं? घटना वाचून काळीज पिळवटून जाईल

SCROLL FOR NEXT