मुंबई

अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचा उलगडा

CD

कळवा, ता. २४ (बातमीदार)ः शिळफाटा परिसरातील दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्यात आले होते. या प्रकरणात शिळ डायघर पोलिसांनी हत्यारांची तस्करी करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले आहे.
शिळफाटा परिसरातील ग्रीन पार्क परिसरात राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना भिवंडी येथील हैदर नावाच्या तरुणाने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख करून मैत्री केली होती. त्यांची मुंब्रा येथील मित्र शहाबुद्दीन अन्सारी यांच्याशी ओळख करून दिली. २८ फेब्रुवारीला शहाबुद्दीनने मुलींशी भिवंडी येथील बीएमडब्ल्यू गाडीतून पिस्तूल तसेच अन्य हत्यारांची तस्करी करणारे कुविख्यात गुंड अमय प्रतापसिंह, जसवंत लाला यांच्याकडून पैसे घेऊन ताब्यात दिले. या दोघांनी दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेऊन दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी देऊन खडवली येथील एका घरात ठेवले होते; पण हत्यारे तस्करीच्या प्रकरणात भिवंडी शांतिनगर पोलिस ठाण्यात दोघांना अटक केली होती. त्यानुसार भिवंडी न्यायालयाने गेल्या तीन दिवसांपूर्वी त्यांना कल्याणच्या आधारवाडी कारागृहात ठेवण्याचे आदेश दिले होते. या दोन मुलींनी सुटका झाल्यानंतर शिळफाटा येथील घर गाठले. चार महिन्यांपासून घरातून बेपत्ता आलेल्या दोन्ही मुली गर्भवती असल्याने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
----------------------------
मदत करणारा गजाआड
शिळ डायघर पोलिसांनी आधारवाडी कारागृहातून या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांना मदत करणाऱ्या शहाबुद्दीन अन्सारीला अटक करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Traffic Update: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग ठप्प, खंबाटकी घाटातही वाहनांची लांबलचक रांग! बातमी वाचा नाहीतर सुट्टी ट्रॅफिकमध्ये जाईल

Latest Marathi News Live Updates : स्वातंत्र्यदिनानिमित्त मांसविक्री बंदीवरून आंदोलन; कल्याणमध्ये तणावाचे वातावरण

Hindu Khatik Samaj Protests : हिंदू खाटीक समाजाचं कल्याण महानगरपालिकेच्या बाहेर आंदोलन, कोंबडी आणत पालिका प्रशासनाच्या निर्णयाचा केला विरोध...

Hingoli Politics: हिंगोली महायुतीत संतोष बांगर व गजानन घुगे यांच्यात आरोपांचा शीतयुद्ध; महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता

Independence Day 2025: भारत-पाकिस्तान फाळणी झाली नसती तर देशाचं स्वरूप कसं असतं?

SCROLL FOR NEXT