मुंबई

पालघर-वाडा राज्यमार्गावर धोका

CD

मोखाडा, ता. २६ (बातमीदार)ः पालघर- वाडा- देवगाव राज्यमार्गावर खोडाळ्यापुढे रस्ता खचला आहे. त्यामुळे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या मार्गावरील वाहतूक विस्कळित होण्याची शक्यता आहे.
मोखाडा तालुक्यातून पालघर- वाडा- देवगाव हा राज्यमार्ग खोडाळा गावापासून दोन किलोमीटरच्या अंतरावर पावसामुळे खचला आहे. नाशिकजवळच्या त्रंबकेश्वर तीर्थक्षेत्रासह मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा मार्ग असल्याने वारकरी, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच प्रवाशांची नियमित वाहतूक असते. तसेच मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी असल्यास पालघर, वाडा तसेच मुंबई आणि नाशिककडे जाण्यासाठी या मार्गाचा सर्रास वापर केला जात असल्याने अपघाताला निमित्त ठरण्याची शक्यता आहे.
------------------------
प्रशासनाचे दुर्लक्ष
तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे रस्ता अधिकच खचण्याची भीती आहे; पण असे असतानाही बांधकाम विभागाकडून फलक अथवा कोणतीही सूचना दिली गेली नसल्याने अपघाताची भीती अधिक बळावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! महागाई भत्ता वाढणार? आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय प्रस्तावित

October 2025 Calendar: दसरा ते दिवाळी, यंदा ऑक्टोबर महिन्यात कोणते महत्त्वाचे सण आहेत? वाचा एका क्लिकवर

Ladki Bahin Yojana : सतेज पाटील यांना लाडकी बहीण योजना आवडली नाही? म्हणाले, योजनेने आमचा कार्यक्रम केला

Latest Marathi News Live Update: गुंड निलेश घायवळच्या घरातील सदस्य गायब

७०० + विकेट्स अन् १५ हजार धावा... ; महान क्रिकेटपटू त्याच्याच देशासाठी झाला परका! क्रीडा मंत्रालयाने घातली बंदी

SCROLL FOR NEXT