मुंबई

‘पावसाळी अधिवेशनात क्लस्टबाबत निर्णय’

CD

भाईंदर (बातमीदार) : जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासात अडथळा ठरणाऱ्या क्लस्टर योजनेवर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातच निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. क्लस्टर योजनेत काय सुधारणा करता येतील यासंबंधीचा अहवाल मिरा-भाईंदर महापालिकेने नुकताच राज्य सरकारकडे सादर केला आहे.
जुन्या, मोडकळीस आलेल्या तसेच बेकायदा इमारतींचा विकास करण्यासाठी १० हजार चौ.मी. क्षेत्रफळ निश्चित करण्यात आले आहे, परंतु या क्षेत्रफळात समाविष्ट असलेल्या सर्वच इमारती पुनर्विकास करण्यास तयार नाहीत. त्यामुळे अन्य इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे. या पार्श्वभूमीवर क्लस्टरमध्ये समाविष्ट होऊ इच्छित नसलेल्या इमारती वगळून चार ते पाच इमारतींसाठी स्वतंत्र छोटा क्लस्टर करता येईल का, यावर याबाबतचा अहवाल महापालिकेने नगरविकास विभागाकडे सादर केला आहे. या अहवालावर विधिमंडळाच्या अधिवेशनातच निर्णय घेतला जाईल, असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: देशाचा आर्थिक विकास पण श्रीमंत-गरीबांमधील दरी वाढत आहे, मोहन भागवातांनी व्यक्त केली चिंता

Gandhi Jayanti 2025: विद्यार्थ्यांनी गांधीजींच्या 'या' ७ शिकवणीतून अवश्य घ्यावे अमूल्य धडे

Dasara 2025 Vastu Tips: दसऱ्याला 'या' वस्तू उधार घेतल्याने होतो वास्तू दोष, जाणून घ्या

'देश मनुस्मृती नव्हे, तर भीम स्मृती म्हणजेच संविधानानुसार चालेल'; वाजपेयींचा उल्लेख करत RSS च्या मेळाव्यात काय म्हणाले माजी राष्ट्रपती?

Dussehra Melava 2025 Live Update : आपल्याला आत्मनिर्भर व्हावं लागेल, स्वदेशी स्वीकारावं लागेल - सरसंघचालक मोहन भागवत

SCROLL FOR NEXT