मुंबई

ग्रामीण स्वच्छता सर्वेक्षणासाठी सज्ज राहावे

CD

पालघर, ता. २९ (बातमीदार) : स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण या राष्ट्रीय उपक्रमासाठी पालघर जिल्ह्यातील ८९९ गावांमध्ये तयारी सुरू आहे. घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी उभारलेल्या सार्वजनिक सुविधांचा प्रत्यक्ष वापर, परिसराची दृश्यमान स्वच्छता, तसेच गावकऱ्यांच्या बदललेल्या मानसिकतेची तपासणी केंद्र सरकारमार्फत नेमलेल्या त्रयस्थ संस्थेमार्फत करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक गावाने एकजुटीने लोकसहभाग, श्रमदान आणि शाश्वत व्यवस्थापनाच्या माध्यमातून स्वच्छतेचा दर्जा उंचवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी केले आहे.
सर्वेक्षणात गावांची स्वतंत्र तपासणी होऊन एक हजार गुणांच्या आधारे जिल्ह्याचे आणि राज्याचे गुणांकन निश्चित केले जाणार आहे. देशभरातील ७६१ जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी हे सर्वेक्षण होणार आहे. गावपातळीवर मिळालेले गुण राज्य व देश पातळीवर परिणाम करतील. त्यामुळे गावातील सर्व सुविधा कार्यान्वित असाव्यात, सांडपाणी रस्त्यावर वाहू नये, परिसरात कुठेही घनकचऱ्याचे ढिगारे आढळू नयेत, प्लॅस्टिक कचरा वर्गीकरण केंद्रात पोहोचवलेला असावा आणि सार्वजनिक ठिकाणांवरील स्वच्छता नजरेत भरणारी असावी, अशी अट तपासणीदरम्यान पाहिली जाणार आहे.
या सर्व घडामोडींचे परिणाम गावांच्या गुणांकनावर, जिल्ह्याच्या कामगिरीवर आणि पुढे राज्याच्या क्रमवारीवर होणार असल्याने गावपातळीवर गांभीर्याने व सातत्याने प्रयत्न व्हावेत, असे निर्देशही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत. या संपूर्ण प्रक्रियेसाठी जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पारसकर नियोजन व समन्वय करत आहेत. पालघर जिल्हा स्वच्छ सर्वेक्षण २०२५ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

गुणांकनात शाश्वत उपाययोजनांचा विचार
धार्मिक स्थळे, शाळा, अंगणवाडी, बाजारतळ आणि सार्वजनिक शौचालये या ठिकाणी स्वच्छतेची स्थिती व्यवस्थित आहे का, हे पाहिले जाणार आहे. कचरा वर्गीकरण केंद्र कार्यरत आहे का, मैला गाळ व्यवस्थापनाच्या सुविधा अस्तित्वात आहेत का, तालुका पातळीवरील प्लॅस्टिक संकलन केंद्र आणि जिल्हास्तरीय गोबरधन प्रकल्प प्रभावी आहेत का याचेही निरीक्षण केले जाणार आहे. याशिवाय, भविष्यात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन व्यवस्था बचत गट किंवा स्थानिक संस्थेमार्फत सातत्याने सुरू ठेवण्यासाठी ग्रामपंचायतींनी केलेल्या शाश्वत उपाययोजनांचाही विचार गुणांकनात केला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Department: भ्रूणहत्येची माहिती द्या, एक लाखाचे बक्षीस घ्या, कन्या सन्मानदिनी आरोग्य विभागाचे आवाहन

'डार्लिंग, आय लव्ह यू' वीण दोघातली ही तुटेना मालिकेत स्वानंदींला ऐकू आले समरचे प्रेमळ शब्द, दोघांची पहिली भेट आणि...

Ajit Pawar: सरकारसोबत खासगी क्षेत्रही आरोग्यसेवेत पुढे यावे; दर्जेदार उपचार सुविधा उपलब्ध करण्याचे आवाहन : अजित पवार

Krishna Janmashtami 2025: जन्माष्टमीनिमित्त मथुरा-वृंदावनला चाललात? मग जाणून घ्या कसं होणार आहे कान्हाचं दर्शन!

वॉशिंग पावडर निरमा... साक्षी- प्रियाचा जेलमधील मारामारीचा सीन पाहून प्रेक्षक हसून बेजार; म्हणतात- यांची WWF लावली तर...

SCROLL FOR NEXT