मुंबई

बहरला गुलमोहोर

CD

वाणगाव, ता. २८ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यासह डहाणू तालुक्यात सध्या गुलमोहर झाडे आकर्षणाचे प्रतीक बनली आहेत. गुलमोहर हा वैशाखातल्या रणरणत्या उन्हातही फुलणारा वृक्ष आहे. हा वृक्ष बहरात नसतानाही इतर वृक्षांपेक्षा अधिक काळ हिरवाई टिकवतो. नागरिक, वयोवृद्ध व्यक्ती, विद्यार्थी वाहने थांबून गुलमोहर झाडांचा आनंद घेत आहेत. रंगाने लाल, केशरी असलेल्या गुलमोहरची झाडे रस्त्यांच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
फेब्रुवारी-मार्चदरम्यान गुलमोहोराची पाने गळायला सुरुवात होते. एप्रिल-मेच्या सुमारास पुन्हा नवीन पालवी फुटते. कोवळी पाने गुलमोहराच्या सौंदर्यात भर टाकतात. लाल-केशरी पाकळ्यांवर पांढऱ्या-पिवळ्या रंगाच्या आकर्षक रेषा असतात अन् त्यामुळे या फुलाचे सौंदर्य अधिकच खुलते. जुलै-ऑगस्टपर्यंत या वृक्षाचे सौंदर्य खुललेले असते. ५०-६० फूट उंचीपर्यंत वाढणारा गुलमोहर तिसऱ्या-चौथ्या वर्षापासून बहरात येऊ लागतो. सामान्यत: गुलमोहराचे सरासरी आयुर्मान ४०-५० वर्षांचे असते. डहाणू तालुक्यात सध्या ठिकठिकाणी गुलमोहोर बहरलेला दिसून येत आहे. गुलमोहोराच्या जमिनीवर येणारी मुळे बगिच्यांत बांधलेले रस्ते किंवा दगडी पायवाटा उखडून टाकू शकतो. अनेक वसाहतींच्या सभोवार, बागांमधून रंग उधळत गुलमोहराच्या पिळदार खोडांचे वृक्ष सध्या अनेक ठिकाणी उभे आहेत. गुलमोहोरचे झाड फक्त आपल्याला सावली देत नाही, तर ते आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर मात करण्यास मदत करते.

पोटाच्या समस्येवर गुणकारी उपाय
अतिसार काढून टाकण्यास मदत करते. गुलमोहोर झाडाच्या खोडाची साल पावडर वापरून पोटाशी संबंधित अनेक समस्यांपासून आराम देऊ शकते.

केस गळणे दूर करते
गुलमोहोरची पाने बारीक करून पावडर पाण्यात मिसळून नियमितपणे वापरल्याने केस गळती कमी होते.

मासिक पाळीचा त्रास बरा होतो
मासिक पाळीच्या दरम्यान स्त्रियांना ओटीपोटात आणि पाठदुखीला तोंड द्यावे लागते. अशा परिस्थितीत गुलमोहोरच्या फुलांचा वापर करून वेदनांपासून आराम मिळू शकतो. यासाठी गुलमोहोरची पाने बारीक करून पावडर बनवा. ही पावडर मधात मिसळून सेवन करा. हे मासिक पाळीच्या त्रासापासून मुक्त होण्यास मदत करू शकते.

तोंडाचे अल्सरवर उपाय
तोंडातील अल्सर दूर करण्यासाठी गुलमोहोरचा वापर करून झाडाच्या सालीच्या पावडरमध्ये मध मिक्स करून सेवन करावे.

सांधेदुखी दूर करते
पिवळ्या रंगाच्या गुलमोहर वनस्पतीची पाने बारीक करून ती लावल्याने सांधेदुखीच्या वेदनापासून आराम मिळतो. तसेच यामुळे सांधेदुखीची समस्या दूर होण्यास मदत होते.

मधुमेह बरा करण्यासाठी
मधुमेह विरोधी गुणधर्मांमुळे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी गुलमोहर प्रभावी आहे. त्याच्या मेथनॉल अर्कचा वापर रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

हवा शुद्धीकरण :
गुलमोहोरची झाडे हवेतील हानिकारक वायू शोषून घेतात आणि ऑक्सिजन सोडतात, ज्यामुळे हवा शुद्ध होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : मांसविक्री, कत्तलखाने बंदीवरुन राज ठाकरे भडकले, म्हणाले- स्वातंत्र्यदिनीच लोकांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जातेय

माजी अग्निवीरांना सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळणार 10 टक्के आरक्षण, सरकारचा महत्त्वाचा निर्णय; धर्मांतर केल्यास होणार जन्मठेपेची शिक्षा

Ratnagiri politics: 'उद्धव ठाकरे गट अन्‌ महायुतीतील आगामी राजकारण तापणार'; आमदार भास्‍कर जाधव यांना घेरण्याची तयारी

Balasaheb Thorat : 'एका बापाला ५० मुले कशी?' बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केले मतदारयादीतील त्रुटींवर प्रश्न

Independence Day 2025: यंदाच्या स्वातंत्र्यदिनाचा उत्सव करा द्विगुणित..! भारतातील 'या' ऐतिहासिक स्थळांना नक्की द्या भेट

SCROLL FOR NEXT