मुंबई

प्रीमियर २

CD

मुलाखत : विक्रांत मेस्सी
...................
आयुष्याकडे पाहण्याचा डोळस ‘दृष्टि’कोन!

शुभम पवार
------
चित्रपटांबरोबरच वेबसीरिज आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता विक्रांत मेस्सी. त्याने आपल्या प्रत्येक भूमिकेमध्ये आपली एक वेगळी छाप निर्माण केली आहे. ‘१२वी फेल’सारख्या गाजलेल्या चित्रपटातून त्याने फक्त अभिनय कौशल्यच नव्हे, तर प्रेक्षकांचा विश्वासही मिळविला. या चित्रपटातील त्याच्या कामाचे कौतुकही झाले. अशातच आता त्याचा ‘आंखों की गुस्ताखियां’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यामध्ये त्याने दृष्टिहीन संगीतकाराची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत शनाया कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन संतोष सिंग यांनी केले असून, हा चित्रपट ११ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याच निमित्ताने विक्रांतशी साधलेला खास संवाद...
.........
मालिकांबरोबरच चित्रपट आणि वेबसीरिज असा तुझा प्रवास झालेला आहे. एकूणच या प्रवासाबद्दल तू काय सांगशील?
- मी जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा खूप समाधान वाटतं. देवाचा आणि लोकांचा मी अत्यंत ऋणी आहे. त्यांनीच मला इथवर पोहोचवलं. आज मला टेलिव्हिजन, चित्रपट आणि ओटीटी या तिन्ही माध्यमांत काम करण्याची संधी मिळते आहे. जे लोक माझ्यावर विश्वास ठेवतात, संधी देतात आणि मला स्वीकारतात त्यांचा मी सदैव ऋणी आहे.

या चित्रपटात तू दृष्टिहीन संगीतकाराची भूमिका निभावत आहेस, त्याबद्दल काय सांगशील?
- हो, मी एका दृष्टिहीन संगीतकाराची भूमिका साकारत आहे. तो एक साधा माणूस आहे. काही कारणामुळे त्याची दृष्टी जाते. दरम्यान, तो एका प्रवासाला निघतो आणि तिथे त्याला एक मुलगी भेटते. ती त्याची साथीदार होते आणि पुढे अनेक गोष्टी घडतात. जरी त्याच्याकडे दृष्टी नसली तरी तो प्रवास त्याच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकतो. हेच या भूमिकेचं वैशिष्ट्य आहे.

ही भूमिका साकारताना तुला मानसिक किंवा शारीरिक आव्हानं जाणवली?
- हो, मला मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही पातळ्यांवर खूप आव्हानांचा सामना करावा लागला. कारण मी फक्त ‘न दिसणं’ अभिनयात दाखवलं नाही, तर प्रत्यक्षात आमच्या टीमने अमेरिकेहून खास लेन्स मागवले होते. या लेन्स डोळ्यांवर लावल्यानंतर ८०-९० टक्के दृष्टी नैसर्गिकरीत्या कमी होते. पूर्णपणे दृष्टी हरवणारे लेन्सही उपलब्ध होते, पण सेटवरील लाइट्स आणि अडथळ्यांमुळे थोडा सुरक्षिततेचा विचार करून आम्ही १५-२० टक्के दृष्टी राखून ठेवली. अशा स्थितीत भावनिक सीन्स देणं किंवा प्रकाशाच्या तीव्रतेत काम करणं फार कठीण असतं. बऱ्याच वेळा शॉटसाठी तासभर वाट बघावी लागायची. त्यामुळे या भूमिकेसाठी मानसिक आणि शारीरिक दोन्ही तयारी करावी लागली.

मिनी फिल्म्स या निर्मिती संस्थेसोबत तुझा दुसरा चित्रपट आहे. पुन्हा एकदा त्यांच्यासोबत काम करण्याचं नेमकं कारण काय होतं?
- मिनी फिल्म्ससोबत काम करणं ही एक वेगळीच अनुभूती असते. याआधी मी त्यांच्यासोबत ‘फॉरेन्सिक’ नावाचा चित्रपट केला होता. मला त्यांच्या टीमसोबत काम करायला खूप आवडतं. कारण ती मंडळी प्रामाणिक आणि अतिशय व्यावसायिक आहेत. त्यांच्या कथा नेहमीच वेगळ्या असतात. सशक्त असतात. त्यांचं कथन करण्याची शैली मला फारच भावते. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळणं, हे माझं भाग्यच आहे.


सहकलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?
- मला सगळ्यांसोबत काम करताना मजा आली. मात्र माझे जास्तीत जास्त शॉट्स शनाया कपूरसोबत होते. तिच्यासोबत काम करणं हा एक समृद्ध अनुभव होता. शनाया खूप मेहनती आणि व्यावसायिक आहे. तिने तिच्या भूमिकेसाठी जवळपास एक महिना वर्कशॉप्समध्ये भाग घेतला. तीदेखील एक दृष्टिहीन पात्र साकारीत आहे. तिची भूमिका आणि कामाची शैली पाहून मलाही प्रेरणा मिळाली.

तू ‘१२वी फेल’, ‘सेक्टर ३६’ आणि ‘द साबरमती रिपोर्ट’ यांसारख्या चित्रपटांतून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहेस. तर स्क्रिप्ट निवडताना तुझे निकष काय असतात?
- माझ्या मते स्क्रिप्ट निवडणं ही एक मोठी जबाबदारी असते. मी सर्वप्रथम पाहतो की कथा प्रेक्षकांसाठी किती मनोरंजक आहे. त्यानंतर मला स्वतःला त्या कथेतील अनुभवातून काही शिकायला मिळतं का आणि माझं जे शिकणं आहे, ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासारखं आहे का, हाही विचार करतो. एक अभिनेता म्हणून मला नेहमीच वेगवेगळी आव्हानं स्वीकारायला आवडतात. त्यामुळे त्या भूमिकेत काय वेगळं करता येईल हे पाहतो.

‘१२वी फेल’ चित्रपट खूप गाजला. त्याने तुझ्या आयुष्यामध्ये काय बदल झाला?
- ‘१२वी फेल’ चित्रपटाने माझं आयुष्यच बदलून टाकलं. लोकांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. हा माझ्या कारकीर्दीतील सर्वात महत्त्वाचा चित्रपट ठरला. मला अनेक पुरस्कार मिळाले आणि प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम आजही तसंच मिळतं आहे. त्याबद्दल मी सगळ्यांचा खूप कृतज्ञ आहे.

तू आज स्वबळावर इतक्या मोठ्या मंचावर उभा आहेस. त्यामुळे नव्या कलाकारांना काय संदेश देशील?
- माझा एकच संदेश आहे. यश आणि अपयश हे जीवनाचे अविभाज्य भाग आहेत. प्रत्येक वेळेस यशच मिळेल असं नाही, कधी अपयश किंवा आव्हानं आली तर खचून जाऊ नका. मी ‘१२वी फेल’मध्ये म्हटलं होतं - ‘रिस्टार्ट करा.’ आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी पुन्हा एकदा उठून ‘रिस्टार्ट करा!’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Department: भ्रूणहत्येची माहिती द्या, एक लाखाचे बक्षीस घ्या, कन्या सन्मानदिनी आरोग्य विभागाचे आवाहन

'डार्लिंग, आय लव्ह यू' वीण दोघातली ही तुटेना मालिकेत स्वानंदींला ऐकू आले समरचे प्रेमळ शब्द, दोघांची पहिली भेट आणि...

Ajit Pawar: सरकारसोबत खासगी क्षेत्रही आरोग्यसेवेत पुढे यावे; दर्जेदार उपचार सुविधा उपलब्ध करण्याचे आवाहन : अजित पवार

Krishna Janmashtami 2025: जन्माष्टमीनिमित्त मथुरा-वृंदावनला चाललात? मग जाणून घ्या कसं होणार आहे कान्हाचं दर्शन!

वॉशिंग पावडर निरमा... साक्षी- प्रियाचा जेलमधील मारामारीचा सीन पाहून प्रेक्षक हसून बेजार; म्हणतात- यांची WWF लावली तर...

SCROLL FOR NEXT