मुंबई

आपत्‍कालीन साखळी ओढण्याच्या प्रमाणात वाढ

CD

आपत्‍कालीन साखळी ओढण्याच्या प्रमाणात वाढ
१९ दिवसांत ६६६ घटना; १५० रेल्वे गाड्यांना उशीर, गैरवापरात तब्बल ५३ टक्क्यांची वाढ
नितीन बिनेकर, सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : रेल्वेने दिलेली आपत्कालीन सुविधा आता गैरवापराचे हत्यार बनली आहे. केवळ १९ दिवसांत मध्य रेल्वे मार्गावर ६६६ आपत्‍कालीन साखळी ओढण्याच्या घटनांमुळे १५० मेल व एक्स्प्रेस गाड्यांना फटका बसला आहे. परिणामी हजारो प्रवासी अडचणीत सापडले. मागील वर्षी याच कालावधीत ९८ गाड्यांचे वेळापत्रक बिघडले होते. यंदा  विनाकारण आपत्‍कालीन साखळी ओढण्याच्या घटनांमध्ये ५३ टक्क्यांनी वाढ झाली असून, रेल्वे प्रशासनाने थेट कारवाईचा बडगा उगारला आहे.
आपत्कालीन परिस्थितीत रेल्‍वे थांबवण्यासाठी प्रत्येक रेल्वे डब्यात प्रवाशांसाठी आपत्‍कालीन साखळी असते, जी ओढल्यावर प्रवाशाही हवे तेव्हा रेल्‍वे थांबवू शकतात, मात्र अनेकदा प्रवाशांकडून छोट्याशा कारणासाठीही आपत्‍कालीन साखळी ओढण्याचे प्रकार वाढले. यामुळे संबंधित रेल्‍वेसोबतच तिच्या मागून येणाऱ्या इतर गाड्यांवरही परिणाम होतो.
मुंबई विभागासारख्या उपनगरी प्रणालीमध्ये, यामुळे मेल/एक्स्प्रेस आणि उपनगरी गाड्या उशिराने धावतात आणि त्याच्या वक्तशीरपणाला बाधा येते. मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ आणि नागपूर या पाच विभागांत  १ जून ते २० जून २०२५ या कालावधीत ६६६ वेळा आपात्‍कालीन साखळी ओढण्यात आली. त्यामध्ये मध्य रेल्वेने भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम १४१ अन्वये एकूण ४६३ जणांवर थेट कायदेशीर कारवाई केली आहे.  या कारवाईत त्यांच्याकडून एक लाख ७० हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे.
 
विभाग -  लेटमार्क
मुंबई विभाग: ५७ मेल-एक्स्प्रेस  
नागपूर विभाग: ५२  मेल-एक्स्प्रेस
भुसावळ विभाग: २६ मेल-एक्स्प्रेस

प्रकरण - अटक - दंड

मुंबई विभाग -२५१-१८४ -रु.६८,८०० हजार

भुसावळ विभाग -१४९,- ११९ -रु.४२,६००  हजार

नागपूर विभाग -१३२-८८ - रु. २८,९०० हजार

पुणे विभाग- ९५ -५४ - रु.२३,६०० हजार

सोलापूर विभाग -३९ -१८-  रु.६५०० हजार

एकूण - ६००- ४६३- १,७०,४०० हजार

काय आहे नियम -
रेल्वे कायदा १९८९ च्या कलम १४१ नुसार, जास्तीत जास्त एक हजार  रुपये दंड किंवा एक वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा आहे. दंड न भरल्यास एक महिना कारावासाची शिक्षासुद्धा होऊ शकते, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.

कोणत्या परिस्थितीत साखळी ओढणे वैध?
-जर एखादा सहप्रवासी, ज्याचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त आहे किंवा लहान मूल चुकले आणि रेल्‍वे सुरू झाल्यास
- चालत्या रेल्‍वेला आग लागली तर
- वृद्ध किंवा अपंग व्यक्तीला ट्रेनमध्ये चढण्यासाठी वेळ लागत असेल आणि तितक्यात रेल्‍वे सुरू होत असल्यास
- एखाद्या प्रवाशाला हृदयविकाराचा झटकासारख्या घटना घडल्यास
- चोरी किंवा दरोडा पडल्याची घटना घडल्‍यास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day: शनिवार वाड्यावर कोणी फडकवला होता तिरंगा?फुकट चहा ते थिएटरमध्ये नारळ,15 ऑगस्ट 1947 ला पुणेकरांचा जल्लोष!

स्कुबा डायव्हिंग करताना अंकिता वालावलकरला झाली दुखापत, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'नाकातून रक्त येयला लागलं आणि...'

Latest Marathi News Live Updates : कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी शेतातच तिरंगा फडकावला

Pandit Nehru Speech Video : भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यदिन भाषणात काय बोलले होते पंडित नेहरू? व्हिडिओ पाहून म्हणाल जय हिंद!

Video : काळीज पिळवटणारी घटना! धोधो पाऊस अन् चालत्या गाड्यांवर कोसळलं झाड; जाग्यावर लोकांचा मृत्यू, धक्कादायक CCTV फुटेज व्हायरल

SCROLL FOR NEXT