मुंबई

दूषित पाणीपुरवठ्यावर तोडगा काढा!

CD

नेरूळ, ता. ३० (बातमीदार) : नेरूळ सेक्टर सहा परिसरात महापालिकेकडून दूषित पाणीपुरवठा होत आहे. याची चौकशी करून त्यावर तोडगा काढण्याची मागणी काँग्रेसचे प्रभाग ८६चे अध्यक्ष जीवन गव्हाणे यांनी महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्याकडे केली आहे. नेरूळ सेक्टर सहा परिसरात अनेक दिवसांपासून महापालिका प्रशासनाकडून दूषित पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सध्याचा पावसाळा, जलवाहिन्यांची सतत होत असलेली कामे यामुळे सुरुवातीला गढूळ, तांबूस, पिवळसर पाणी येत असल्याचा समज होता; परंतु दूषित पाण्याची समस्या अनेक दिवसांपासून असून, त्यामुळे नेरूळ सेक्टर सहामधील रहिवासी पोटदुखीच्या आजाराने त्रस्त आहेत. या समस्येचे गांभीर्य पाहता दूषित पाण्याच्या समस्येवर तोडगा काढून रहिवाशांना स्वच्छ पाणीपुरवठा करण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी जीवन गव्हाणे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut announcement: संजय राऊतांची मोठी घोषणा!, ठाकरे बंधू मुंबईसह ‘या’ महापालिका निवडणूक एकत्र लढवणार

Kangana Ranaut Marriage : मिस्ट्री मॅन, गुपचूप लग्न अन् आयुष्यात...; कंगना राणौतचा धक्कादायक खुलासा, म्हणाली प्रेमात सगळं...

Jitendra Awhad: आझादीमध्ये राहू द्या; स्वातंत्र्य दिनी मांस विक्री बंदीवरून जितेंद्र आव्हाडांचा सरकारवर हल्लाबोल

Santosh Bangar Vs Gajanan Ghuge: वाकयुद्ध रंगलं, महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता | Politics | Sakal News

WAR 2 REVIEW: बेस्ट की पैसे वेस्ट? कसा आहे ह्रितिक रोशन आणि एनटीआरचा 'वॉर २' ; वाचा रिव्ह्यू

SCROLL FOR NEXT