मुंबई

मुंबई-गोवा महामार्गाच्या भुयारी मार्गाची दुरवस्था

CD

पेण, ता. १ (वार्ताहर) : मुंबई-गोवा महामार्गाचे काम १५ वर्षांपासून सुरू असून, आजही अपूर्णच आहे. पेण-वडखळदरम्‍यान काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण झाले असले तरी मार्गालगत गावांसाठी बांधण्यात आलेल्‍या भुयारी मार्गाची दुरवस्‍था झाली आहे. त्या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, पाणी साचल्‍याने खोलीचा अंदाज येत नसल्‍याने वाहने उसळतात. परिणामी चालकांसह प्रवाशांमध्ये मानदुखी, कंबरदुखीच्या व्याधी बळावल्‍या आहेत.
कोकणातील एकमेव असणारा मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येत आहे. वडखळ ते नागोठणेदरम्यान अनेक ठिकाणी कामे सुरू असून, गणेशोत्सवापर्यंत पूर्ण होण्याची शक्‍यता धूसर आहे. लगतच्या गावांत जाण्यासाठी महामार्गाजवळ भुयारी मार्ग तयार करण्यात आला आहे, परंतु तरणखोप, अंतोरे फाटा, झी गार्डन हॉटेल, रामवाडी, वडखळ आदी ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांसह वाहनचालकांची डोकेदुखी वाढली आहे. पेणच्या गडबपासून पुढे कोलेटी, नागोठणे, कोलाडदरम्यान चौपदरीकरणाचे काम संथ गतीने सुरू असून, अनेक ठिकाणी काम अपूर्ण आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे याही वर्षी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना फटका बसणार आहे. संबंधित ठेकेदाराने किमान ग्रामीण भागात जाणाऱ्या नागरिकांसाठी असलेल्‍या भुयारी मार्गाची दुरुस्ती करून घ्यावी. तसेच साचलेल्‍या पाण्याचा निचरा होण्यासाठी नियोजन करावे.
- हरिश बेकावडे, सामाजिक कार्यकर्ते

मुंबई-गोवा महामार्गाच्या सर्व भुयारी मार्गांची पाहणी करण्यात येणार आहे. तसेच खड्डे बुजवण्याचे तसेच पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्‍य नियोजन केले जाईल. महामार्गावरील खड्डे बुजवण्याबाबत कंत्राटदाराला सांगण्यात येईल.
- यशवंत घोटकर, अधिकारी, मुंबई-गोवा महामार्ग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : ''पापाची हंडी आधीच फोडलीये, आता BMC मध्ये विकासाची हंडी लागेल अन् लोणी…; फडणवीस काय म्हणाले?

Latest Maharashtra News Updates : नाशिकध्ये मनसेचा राडा परप्रांतीयांना दिला चोप

Video: ''सरपंच खाली उतरा'', चिमुकल्यांचा दंगा; रस्त्यासाठी गाडीवर चिखलफेक

अ बिटरस्वीट लव्ह स्टोरी! भूषण पाटीलच्या 'कढीपत्ता' चित्रपटात दिसणार अनोखी प्रेमकहाणी

फेक सॅलरी स्लीपवर नोकरी मिळाली, पण काम येईना; बॉस तरुणीने बँक स्टेटमेंट मागताच...; काय घडलं?

SCROLL FOR NEXT