कल्याणमध्ये श्री जगन्नाथ रथयात्रा
कल्याण, ता. १ (वार्ताहर) : पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिर आणि रथयात्रा ही जगभरात प्रसिद्ध आहे. पुरी येथील श्री जगन्नाथ रथयात्रेच्या प्रेरणेने कल्याणात निघालेल्या श्री जगन्नाथ रथयात्रा काढण्यात आली आहे. कल्याण पश्चिमेचे माजी आमदार नरेंद्र पवार आणि कल्याण विकास फाउंडेशनच्या अध्यक्ष हेमलता पवार यांच्या हस्ते आरती करण्यात आली. त्यानंतर रथयात्रेला सुरुवात झाली.
पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिर आणि तिथल्या रथयात्रेची संपूर्ण जगभरात ख्याती आहे. ही रथयात्रा आणि इथल्या मंदिरात श्री जगन्नाथाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून लाखो भक्त येत असतात. त्यामुळे कल्याण पश्चिमेतील अमृत पार्क येथील इस्कॉन केंद्रातर्फे यंदा कल्याणात श्री जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. येथील पारनाका श्रीराम मंदिर येथून निघालेली ही रथयात्रा लालचौकी, मोहिंदर सिंग मार्ग, मोहन हाइट्स, वायले नगर, पोद्दार स्कूलमार्गे अमृत पार्क येथील इस्कॉन केंद्र येथे या रथयात्रेचा समारोप करण्यात आला.
विशेष म्हणजे पुरी येथील श्री जगन्नाथ रथयात्रेप्रमाणेच कल्याणमध्ये ही रथयात्राही काढण्यात आली. ज्यामध्ये श्री जगन्नाथ आणि श्रीकृष्ण यांच्या जयघोषाने संपूर्ण कल्याण नगरी दुमदुमून गेली होती. या रथयात्रेमध्ये शेकडो भाविक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. या वेळी कल्याण पश्चिमेतील इस्कॉन केंद्राचे प्रमुख अनिरुद्ध भगवान दास, प्रभानु दास, सीए उत्कर्ष मेहता, सीए निर्मल सिंग, माजी आमदार नरेंद्र पवार, कल्याण विकास फाउंडेशनच्या अध्यक्ष हेमलता पवार, भाजपच्या प्रदेश सचिव प्रिया शर्मा यांच्यासह इस्कॉनचे अनेक सदस्य आणि भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.