नवी मुंबई, ता. १ (वार्ताहर) : कमी व्याजदरात १०० ते २०० कोटींचे कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने एका टोळीने ऐरोलीतील एका उद्योजकाकडून सव्वा कोटी रुपये उकळून त्यांची फसवणूक केली. रबाळे एमआयडीसी पोलिसांनी या टोळीतील चौकडीविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
फसवणूक झालेले ७८ वर्षीय व्यावसायिक ऐरोलीमध्ये राहण्यास असून, त्यांची रबाळे एमआयडीसीमध्ये मशिनिंगची कंपनी आहे. या कंपनीचा विस्तार वाढविण्यासाठी त्यांना १०० कोटी रुपये कर्जाची आवश्यकता होती. डिसेंबर २०२३ मध्ये मित्राच्या ओळखीतून हे उद्योजक धानेश खंडेराव देशमुख, प्रमिला पांडुरंग लाड, प्रशांत उर्फ राजू पिल्लाई व पुष्पा गुप्ते या चौकडीच्या संपर्कात आले होते. त्या वेळी या चौकडीने कर्ज प्रक्रिया शुल्काच्या नावाखाली टप्प्याटप्प्याने आरटीजीएस आणि बँक ट्रान्सफरद्वारे पैसे उकळले. त्या वेळी टोळीने पहिल्या टप्प्यात १०० कोटींचे कर्ज मिळवून देण्यात असल्याचे भासवून करारनामे आणि नोटरीची कागदपत्रे तयार करून घेतली. त्यानंतर या टोळीने २०० कोटींचे कर्ज मिळवून देण्याचे प्रलोभन त्यांना दाखविले. त्यानंतर टोळीने कर्जाच्या नावाखाली वेळोवेळी प्रक्रिया शुल्क, वकिलांची फी, कागदपत्रांचे शुल्क अशी वेगवेगळी कारणे सांगून एक कोटी २५ लाख रुपये उकळले.
------------------
अशी केली फसवणूक
फसवणूक करणाऱ्या टोळीतील आरोपी धानेश देशमुख हा मुख्य सूत्रधार असून, त्याने या उद्योजकासोबत बनावट कर्ज करार करून त्यांना बाऊन्स होणारे चेक दिले होते. प्रमिला लाड ही धानेशची सहकारी असून, ती या उद्योजकांसोबत सतत संपर्कात राहून त्यांना कर्ज मिळेल, अशी खोटी माहिती देऊन त्यांना गुंतवून ठेवले होते. प्रशांत ऊर्फ राजू पिल्लाई याने कर्ज वितरक असल्याचे भासवून त्याने फसवणूक केल्याचे तपासात आढळून आले आहे. पिल्लाई याची सहकारी असलेली पुष्पा गुप्ते हिने बनावट डीडीचे फोटो दाखवून उद्योजकाची फसवणूक केल्याचे आढळून आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.