रस्त्यावरील बॅनर महापालिकेने हटवले
कल्याण, ता. १ (बातमीदार) : महापालिका क्षेत्रात स्मार्ट सिटीअंतर्गत अनेक कामे सुरू आहेत. यात महापालिका शहराच्या सौंदर्यीकरणावर अधिक भर देण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यानुसार शहराला बकालपणा आणणारे आणि रस्त्यांवर अडथळा ठरणारे अनधिकृत पोस्टर, बॅनर, होर्डिंग महापालकेकडून हटविण्याची कारवाई नेहमीच सुरू असते. कल्याण पूर्वेतही ५-ड प्रभाग क्षेत्रातील असंख्य होर्डिंग सहाय्यक आयुक्तांच्या सूचनेनंतर हटविण्यात आले आहेत.
शहरातील अंतर्गत रस्त्यांवर असलेले विजेचे खांब, दिशादर्शक फलक, नामफलक, बस थांबे, पदपथे अशा सर्वच ठिकाणी अनधिकृत बॅनरबाजी सुरू असते. राजकीय तसेच व्यावसायिक होर्डिंग अशा सार्वजनिक ठिकाणी सर्रासपणे लावले जातात; मात्र पुन्हा एकदा महापालिकेने असे सर्व बॅनर हटविण्याची मोहीम हाती घेतली आहे. याबद्दल सहाय्यक आयुक्त उमेश यमगर म्हणाले की, प्रभाग क्रमांक ५-ड मध्ये अनधिकृतरित्या लावलेले बॅनर व पोस्टर्स हटविले आहेत. सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत प्रचार साहित्य लावणे हे कायद्यानुसार गुन्हा आहे. नागरिकांनी कोणतेही बॅनर किंवा पोस्टर लावण्यापूर्वी महापालिकेची अधिकृत परवानगी घ्यावी. अन्यथा योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. शहराचे सौंदर्य टिकवण्यासाठी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.