मुंबई

वाशी-तुर्भे लिंक रोडवर वाहतूक कोंडी

CD

वाशी-तुर्भे लिंक रोडवर वाहतूक कोंडी
दुरुस्‍तीच्या कारणास्‍तव अनेक महिन्यांपासून मार्गिका बंद; वाहनचालक नाराज
तुर्भे, ता. १ (बातमीदार) ः वाशी-तुर्भे लिंक मार्गावरील उड्डाणपुलाच्या दुरुस्तीसाठी वाशीहून तुर्भे स्टोअर (ठाणे)कडे जाणारी मार्गिका मागील वर्षभरापासून बंद ठेवण्यात आली आहे. अद्याप या मार्गिकेच्या दुरुस्तीचे काम पालिकेने सुरू न केल्याने वाहनचालकांकडून नाराजी व्‍यक्‍त केली जात आहे. या बंद मार्गिकेमुळे वाहनचालकांना एक किलोमीटरचा अधिकचा फेरा मारावा लागत आहे. पावसाळ्याआधी दुरुस्‍तीचे काम होणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले होते; मात्र अद्याप या कामाला सुरुवात झाली नसल्याने वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

वाशी-तुर्भे लिंक रोडवरील उड्डाणपुलाच्या दुरुस्तीसाठी १२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. शिवाय या दुरुस्‍तीसाठी गेल्या वर्षभरापासून वाशी-तुर्भे लिंक रोडवरील उड्डाणपुलाची एक मार्गिका बंद करण्यात आली आहे. त्यामुळे ही वाहतूक सायन-पनवेल मार्गावरून सुरू आहे. शिवाय कामाला विलंब झाल्याने वाशी किंवा तुर्भे गाव व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना ठाणे-बेलापूरकडे जाण्यासाठी सानपाडा रेल्‍वेस्‍थानकमार्गे ठाणे- बेलापूर मार्ग गाठावे लागते. त्यासाठी नागरिकांचा वेळ व पैसादेखील अधिक खर्च होत आहे. शिवाय काही नागरिकाना रिक्षाने तुर्भे स्‍थानक गाठून पुढचा प्रवास करावा लागत आहे. मागील वर्षापासून ही मार्गिका बंद आहे. मात्र अद्याप याचे काम सुरू न झाल्याने वाहनचालकांकडून संताप व्‍यक्‍त केला जात आहे. मागील काही दिवसांपासून ठाणे-बेलापूर मार्गावर वाहनांची संख्या वाढली आहे. त्‍यातच सकाळ-सायंकाळ या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळते. त्‍यातच ही मार्गिका गेल्या वर्षापासून बंद असल्याने कोंडीमध्ये अधिकची भर पडत आहे. यासंदर्भात पालिकेचे अभियंता प्रशांत देखमुख यांना विचारले असता, उड्डाणपुलाच्या दुरुस्तीच्या कामासाठी निविदा प्रक्रिया पार पडल्याने येत्या काही दिवसांत काम सुरू केले जाईल. पावसाळा असल्याने कामाला थोडा उशीर होऊ शकतो, असे सांगण्यात आले.
...........
संरचनेत आढळली त्रुटी
तुर्भे सेक्टर २१ येथील पालिकेच्या परिवहन आगाराकडून ठाणे-बेलापूर रस्त्यावरून तुर्भे स्‍थानकाकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या एका स्पॅनमधील साइडचा भाग काही प्रमाणात सुटलेल्या अवस्थेत दिसून आला होता. त्या अनुषंगाने संरचनात्मक डिझाइन आणि सल्ला देणाऱ्या कंपनीमार्फत उड्डाणपुलाच्या भागाची महापालिकेच्या अभियंत्यांसोबत प्रत्यक्ष स्थळपाहणी करण्यात आली. त्यानंतर संरचना कन्सल्टंट यांच्याकडून उड्डाणपुलाच्या स्पॅनचा संरचना व स्थिरता अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील अत्यावश्यक दुरुस्तीसाठी ही मार्गिका बंद करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT