मुंबई

गरिबांचे रेशनिंग काळ्या बाजारात

CD

रास्त धान्याचा काळाबाजार
भिवंडी गुन्हे शाखेकडून धान्यसाठा जप्त
भिवंडी, ता. २ (वार्ताहर) : गरीब जनतेसाठी रेशनिंगवर वितरित केला जाणारा धान्यसाठा टेम्पोतून शहापूर येथे काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन निघाले होते, या वेळी राजनोली नाका येथे भिवंडी गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत दीड लाखांचा धान्यसाठा जप्त करण्यात आला. या वेळी दोन रास्त धान्य दुकानदारांसह टेम्पोचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलुंड येथील रेशनिंग दुकानदार पीयूश ओधाजी ठक्कर, रमेश भानुशाली यांनी आपल्या दुकानातून नागरिकांना शासकीय धान्यसाठ्यातून वितरणासाठी आलेला तांदूळ, गहू, साखर, डाळी इत्यादी एक लाख ४९ हजार रुपयांचा धान्यसाठा टेम्पोतून शहापूरच्या दिशेने जात असल्याची माहिती भिवंडी गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक धनराज केदार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने राजनोली नाका या ठिकाणी सापळा रचून मंगळवारी (ता. १) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास संशयित टेम्पो येताच त्याला थांबवून तपासणी केली. टेम्पोत या दुकानदारांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी रेशन दुकानावरील धान्यसाठा काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे निष्पन्न झाले. भिवंडी गुन्हे शाखेच्या वतीने कोनगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पीयूश ठक्कर, रमेश भानुशाली व टेम्पोचालक रविकिशन सिंग या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच आठ लाख ४९ हजार रुपये किमतीचा धान्यसाठा टेम्पोसह जप्त केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखेचे सहा. पोलिस निरीक्षक धनराज केदार हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Walmik Karad: हातावर शिवरायांचं चित्र गोंदलं म्हणून हात तोडून चौकात लटकवणार; वाल्मिक कराडची महिलेमार्फत धमकी

JOSAA Counseling Result 2025: जोसा काउंसिलिंग फेरी 3 चा निकाल जाहीर, चेक करा थेट एका क्लिकवर

VIRAL VIDEO: राम कृष्ण हरी! हिरवी नववार, मराठमोळा श्रृगांर, डोईवर तुळस, रिंकू राजगुरूचा वारीतील व्हिडिओ व्हायरल

Latest Maharashtra News Updates : गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला

Satara News : ओंकार साळुंखे ‘बालगंधर्व’ने सन्मानित; महाराष्ट्रातील प्रसिद्ध ड्रम पॅड वादक म्हणून नाव कमावले

SCROLL FOR NEXT