मुंबई

जोरदार पावसाने धामणीमध्ये ७१ टक्के पाणीसाठा

CD

कासा, ता. २ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यातील महत्त्वाचे जलस्रोत असणारे धामणी धरण बुधवारी (ता. २) तब्बल ७०.८७ टक्के भरले आहे. धामणी धरणातून सध्या ६५० क्युसिक पाणी विद्युतनिर्मितीसाठी सोडण्यात येते. विशेष म्हणजे, मागील वर्षी २ जुलै रोजी धामणी धरणात केवळ २०.९७ टक्केच पाणीसाठा होता. मागील काही दिवसांपासून पावसाने जोर धरल्यामुळे धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाणी साठले जात आहे. यामुळे शेतकरीवर्गासह नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

सद्य:स्थितीत धामणी धरणाची पाणीपातळी ११२.७५ मीटरवर पोहोचली असून, सुमारे १९५.८४४ दशलक्ष घनमीटर (एमसीएम) पाणीसाठा झाला आहे. दरम्यान, कवडास-उन्हेयी धरणात ४४.७७ टक्के पाणी साठवणूक झाली असून, गेल्या वर्षी याच दिवशी या धरणात ६५.५० टक्के पाणी होते. धामणी धरण परिसरात पावसाचा जोर कायम असल्याने लवकरच धरण पूर्ण क्षमतेने भरेल, असा विश्वास शाखा अभियंता प्रवीण भुसारे यांनी व्यक्त केला आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यास पालघर जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्यासह सिंचन आणि वीजनिर्मितीच्या गरजा सुरळीत भागवता येणार आहेत. कवडास उन्नेयी बंधारा ४४ टक्के भरले असून, वांद्री मध्यम प्रकल्पामध्ये २५ टक्के पाणीसाठा तयार झाला आहे.
----
जयसागर धरण जूनमध्येच तुडुंब
जव्हार (बातमीदार) : पावसाळ्यात जुलैच्या अखेरीस तुडुंब भरणारे जव्हारचे जयसागर जलाशय हे यंदा जूनमध्येच (ता. ३०) पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले आहे. या धरणाची सहा मीटर उंची मागील वर्षी वाढविण्याचे काम पूर्ण झाले होते. उंची वाढल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात कमालीची वाढ दिसून येत आहे. धरण क्षेत्रातील कोरडी जमीनही पाण्याखाली गेली आहे. जयसागर जलाशय भरल्याने जव्हारकरांची वर्षभराची चिंता दूर झाली आहे. जव्हार नगर परिषद क्षेत्र, कासटवाडी आणि रायतळे या ग्रामपंचायतींचा काही भाग धरण क्षेत्रात येतो.

----
पालघरमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस
वाणगाव (बातमीदार) : पालघर जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस होत असल्याने भात बियाण्यांची उगवण क्षमता चांगली झाली असून, रोपे जोमदार अवस्थेमध्ये आहेत. भात रोपेही १५ ते २० दिवसांची झाली आहेत. पुढील आठ ते दहा दिवसांत लावणीयोग्य रोपे होतील. जिल्ह्यात समाधानकारक पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. माॅन्सून हंगामातील सुरुवातीच्या जूनमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.

जूनच्या सुरुवातीपासूनच प्रत्येक आठवड्यात सातत्यपूर्ण पाऊस होत आहे. त्यामुळे एकूण ५७६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तलासरी तालुक्यात सर्वाधिक ७४७.८ मिमी, तर मोखाड्यामध्ये सर्वात कमी ४३०.६ मिमी पाऊस झाला. २०२४ मध्ये जूनमध्ये ३६७.१ मिमी पाऊस झाला होता. जूनमध्ये जिल्ह्यात सरासरी ४११.९ मिलिमीटर पाऊस होतो. त्या तुलनेत यावर्षी ५७५ मिमी म्हणजे सरासरीपेक्षा अधिक १३९.६ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

तालुकानिहाय सरासरी पावसाची नोंद
तालुका पाऊस (मिली) टक्केवारी
वसई ५१९ ८८
वाडा ५७० १२५
डहाणू ६६० १४९
पालघर ५७३ ११४
जव्हार ५३६ १२५
मोखाडा ४३४ ११९
तलासरी ७४७ १९१
विक्रमगड ५५७ ११०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

SCROLL FOR NEXT