वारकऱ्यांसाठी श्री क्षेत्र पंढरपूर मोफत दर्शन
घाटकोपर, ता. १ (बातमीदार) ः आषाढी आणि कार्तिकी एकादशीला देशभरातून वारकरी पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी पायी वारी काढतात. अनेकांना काही कारणास्तव पंढरपूर वारी करणे शक्य नसते, मात्र आषाढी आणि कार्तिकीची वारी प्रत्येक वारकरी मंडळींना घडावी, या उद्देशाने घाटकोपरमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वतीने श्री क्षेत्र पंढरपूर मोफत दर्शन सोहळा २०२५ आयोजित करण्यात आला आहे. शिवसेनेच्या माजी नगरसेविका अश्विनीताई दीपकबाबा हांडे यांच्या वतीने या दर्शन सोहळ्याचे आयोजन केले आहे. शनिवारी (ता. ५) प्रभाग १२८ मधून सकाळी टाळ, मृदंग व डोक्यावर तुळस घेत दिंडी काढण्यात येणार आहे. वारीमध्ये सहभागी होण्यासाठी शिवसेना भटवाडी शाखा क्रमांक १२८ येथे नावनोंदणी करावी, असे आवाहन माजी नगरसेवक दीपकबाबा हांडे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.