मुंबई

कवठ्याच्या वाडीला मिळणार हक्काचा रस्ता?

CD

बदलापूर, ता. २ (बातमीदार) : बदलापूर पूर्वेकडील पनवेल रिंग रूट परिसरापासून अवघ्या दीड ते दोन किलोमीटर अंतरावर कवठ्याची वाडी ही आदिवासी वस्ती आहे. स्वातंत्र्याची ७५ वर्षे लोटूनही या रस्त्याची सोय नसल्याने येथील बांधवांना खड्डे आणि चिखल तुडवत रोज पायपीट करावी लागत आहे. ही समस्या ‘सकाळ’ वृत्तपत्राने प्रसिद्ध केल्यानंतर कुळगाव बदलापूर पालिका प्रशासनाने याची तत्काळ दखल घेतली. मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी संबंधित परिसराची पाहणी केली. हा परिसर शहर विकास आराखड्यात समाविष्ट असेल तर दोन महिन्यांतच या कामाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

कवठ्याची वाडी या परिसरातील काही अंशी भाग हा पालिकेच्या हद्दीत येतो. उर्वरित जंगलसदृश्य परिसर हा वन विभागाच्या ताब्यात आहे. त्यामुळे या भागाची पाहणी मुख्याधिकारी गायकवाड यांनी केली. तसेच, येथील रहिवाशांसोबत चर्चा करून त्यांच्या इतर समस्या जाणून घेतल्या. शहर विकास आराखड्यात हा परिसर येत असेल, किंवा वन विभाग क्षेत्रात यातील कोणता परिसर मोडतो? या सगळ्याची माहिती घेऊन पालिका हद्दीतील समस्या सोडवण्याचे आश्वासन गायकवाड यांनी दिले. रस्त्याच्या कामासंदर्भात संपूर्ण माहिती घेऊन रस्त्याच्या बांधकामाबाबत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

पर्यायी स्मशानभूमी उभारणार!
कवठ्याची वाडी या आदिवासी पाड्यातील रस्ता, वीज, पाणी या व्यतिरिक्त या ठिकाणी वर्षाेनुवर्ष असलेल्या गावकीच्या स्मशानभूमीची झालेली दुरवस्थाही नागरिकांनी बोलून दाखवली. स्मशानभूमीची ही जागा थोर महापुरुष बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजाला वतन म्हणून मिळाली आहे. ही जागा ताब्यात देण्यासाठी पालिकेला न्यायालयातून नोटीस बजावण्यात आली. त्यामुळे पर्यायी स्मशानभूमीची व्यवस्था करण्यासाठी याच परिसरातील एका खासगी व्यक्तीच्या जागेत त्यांच्या परवानगीने भाडेतत्त्वावर घ्यावी लागेल. पालिका त्या जागेत स्मशानभूमी उभारणार असल्याची संकल्पना मुख्याधिकारी गायकवाड यांनी बोलून दाखवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT