मुंबई

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

CD

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा
अंबरनाथमध्ये १२ जणांवर गुन्हा दाखल
अंबरनाथ ता. ३ (वार्ताहर) : शहरातील एका घरात जुगार खेळत असताना पोलिसांनी छापा टाकला. या वेळी १२ जण मटका नावाचा जुगार खेळत असल्याचे आढळून आले. त्यानुसार पोलिसांनी या १२ ही जणांवर गुन्हा दाखल केला. महिनाभरातील पोलिसांनी केलेली ही तिसरी कारवाई आहे.
अंबरनाथ शहरात मोठ्या प्रमाणात जुगार अड्डे सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पोलिस कारवाई सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी दोन गाळ्यांवर छापा टाकला होता. या वेळी १५ ते २० जणांवर गुन्हे दाखल करून सुमारे ३५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. दरम्यान, पोलिसांची ही कारवाई सुरू असून, बुधवारी (ता. २) रात्री १०च्या सुमारास अशोक गायकवाड या व्यक्तीच्या घरात जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी पश्चिमेच्या वांद्रापाडा परिसरातील गायकवाडच्या घरी छापा टाकला. बिजी बाबू (वय ३७), मुदशर रफिक शेख (३६), प्रमोद रामदेव रसाळ (४७), संतोष कैलास गौड (४०), अशोक रोहिदास गायकवाड (४३), आयप्पा बाजीराव मुदलीयार (३१), अमित उमाजी गायकवाड (२०), मेहबूब खालील शेख (२३), विजय अशोक पाटील (२८), मनोज मंगल कंगाले (३३), विकास दत्ता लाठे (२४), किरण गागडे यांना मटका खेळताना ताब्यात घेतले. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025 India Squad: वनडे वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! १५ जणींच्या संघात कोणाला मिळाली संधी?

Mumbai Rain Alert: घाटकोपर-अंधेरी लिंक रोड बंद; साकीनाका परिसरात पाणीच पाणी

'हम आपके हैं कौन' साठी कुणाला किती मिळालेलं मानधन? माधुरीला सगळ्यात जास्त तर रीमा लागूंना मिळालेले फक्त...

Mumbai-Pune Latest Rain Live Updates Maharashtra :मुखमेडमध्ये मुसळधार पाऊस, हसनळ गाव पाण्याखाली

Asia Cup 2025 India Squad: श्रेयस अय्यरची चूक काय? त्याच्यासह यशस्वी अन् ६ खेळाडूंची संधी हुकली; अजित आगरकर म्हणतो...

SCROLL FOR NEXT