मुंबई

खंडीत वीजपुरवठ्यातून अखेर सुटका

CD

शहापूर, ता. ५ (वार्ताहर): तालुक्यातील आवाळे ग्रामपंचायतीच्या पंचक्रोशीतील पाच गावे आणि १८ पाडे दोन महिन्यांपासून सततच्या होणाऱ्या खंडित वीजपुरवठ्याच्या समस्येने त्रासले आहेत. याच अनुषंगाने शुक्रवारी (ता. ४) महावितरणाविरोधात मोर्चा काढण्यात आला होता. या वेळी अधिकाऱ्यांनी तातडीने या भागातील वीज समस्या सोडविण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. त्यामुळे आवाळे गावातील नागरिकांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
आवाळे, माहुली, वाडूपाडा, चांदरोटी, आंबेडोह, कराडे, सुतारपाडा, शेकटपाडा, मामणोली जुनवणेपाडा, माहुली शिवमंदिर, काटेकुई, शाळेचापाडा, बोरीचापाडा या गावे आणि पाड्यांमधील वीजरोहित्राची दुरुस्ती करावी, जीर्ण झालेले सर्व वीजखांबांसह वाहिन्या बदलून मिळाव्यात, त्यांच्यासाठी काँक्रीटची बैठक व्यवस्था करावी, अशा मागण्या मोर्चातून करण्यात आल्या. या मोर्चानंतर महावितरणकडून शुक्रवारी तातडीने कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे तानसा अभयारण्याच्या जंगल क्षेत्रात मोडणाऱ्या माहुली परिसरातील आवाळे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील वाड्या-वस्त्यांना होणारा वीजपुरवठा पूर्ववत होण्याची आशा पल्लवित झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT