मुंबई

कोंडी फोडण्यासाठी वाहतुकीत बदल

CD

कोंडी फोडण्यासाठी वाहतुकीत बदल
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १० : डोंबिवलीहून कल्याण, ठाकुर्ली दिशेने जाणारी वाहने चोळेगावमार्गे म्हसोबा चौकातून ९० फिट रोडवर जातात. चोळेगावातील हनुमान मंदिराजवळील रस्ता अरुंद असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. ही वाहन कोंडी फोडण्यासाठी येथील वाहतूक मार्गात बदल केला आहे. वाहतूक विभागाने तशी सूचना जारी केली आहे.

डोंबिवली वाहतूक उपविभागीय हद्दीतील ठाकुर्ली पूर्वेतील ९० फिट रोडकडून म्हसोबा चौक मार्गे ठाकुर्ली रेल्वेस्थानकाकडे जातात. जुने हनुमान मंदिर येथे ठाकुर्ली रेल्वेस्थानक, ९० फिट रोड म्हसोबा चौक व चोळेगावातून येणारी वाहने ही समोरासमोर येतात. या वळणावर रस्ता अरुंद असल्याने समोरासमोर आलेल्या वाहनांमुळे कोंडी होते. त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये, परिसरातील वाहतूक सुरळीत व सुनिश्चित राहावी, यासाठी वाहतूक विभागाने येथील वाहतुकीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या आदेशानुसार अधिसूचना जारी केली आहे.

वाहतुकीत केलेला हा बदल पुढील ३० दिवस प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आला आहे. या दिवसात कोणती ही हरकत अथवा आक्षेप प्राप्त न झाल्यास ही अधिसूचना पुढील आदेश येईपर्यंत कायम स्वरूपात अमलात आणली जाईल, असे वाहतूक विभागाने सांगितले आहे.

प्रवेश बंद -
९० फीट रोडवरून म्हसोबा चौक मार्गे जुने हनुमान मंदिर, चोळेगावकडे जाणाऱ्या वाहनांना म्हसोबा चौक येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात आला आहे.

पर्यायी मार्ग
सदरची वाहने ९० फीट रोडने पुढे जाऊन शिवमंदिर तलाव रोडने अथवा न्यू कल्याण रोडने चोळेगाव मार्गे अथवा छत्रपती शिवाजी महाराज चौक, कल्याण इच्छीत स्थळी जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheesh Mahal Delhi: दिल्लीतील 370 वर्षे जुने 'शीशमहाल' अखेर उघडले! जाणून घ्या तिकिट, वेळ आणि विशेष माहिती

आजचे राशिभविष्य - 11 जुलै 2025

मोठी बातमी! सोलापूर जिल्हा बॅंकेचे ६ शाखाधिकारी निलंबित; बनावट सोन्यावर दिले लाखोंचे कर्ज; माळशिरस, मंगळवेढा, सांगोल्यातील शाखांमधील धक्कादायक प्रकार

Panchang 11 July 2025: आजच्या दिवशी ‘शुं शुक्राय नमः’ या मंत्राचा किमान 108 जप करावा

व्रत आरोग्याचे!

SCROLL FOR NEXT