मुंबई

अल्पवयीन मुलाचा २४ तासांत शोध

CD

खालापूर, ता. १२ (बातमीदार) ः मित्रांशी झालेल्या भांडणामुळे पोलिस आपल्याला पकडतील, या गैरसमजुतीतून घर सोडून गेलेल्या १५ वर्षीय मुलाला चोवीस तासांत खोपोली पोलिसांनी शोधून सुखरूप पालकांच्या ताब्यात दिले.
शहरातील क्रांतीनगर येथे राहणारा नववीत शिकणाऱ्या १५ वर्षांच्या मुलाचे ८ जुलैला मित्रांसोबत किरकोळ भांडण झाले होते. भांडण सुरू असताना दुचाकीवरून जाणारे पोलिस आपल्याला पकडतील, अशी त्‍याची गैरसमजूत झाली. त्‍यानंतर मित्रांकडे खेळायला जातो, असे सांगून तो घराबाहेर पडला; मात्र रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने रिक्षाचालक असलेल्या वडिलांनी खोपोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
मुलगा अल्पवयीन असल्याने गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत, पोलिस पथकाने त्‍याच्या मित्रांकडे चौकशी केली. या वेळी नंदुरबार-धुळे येथील एका मित्राच्या सतत संपर्कात असल्याचे समजले. पोलिसांनी नंदुरबार येथील जुबेर याच्याशी संपर्क साधला असता मुलाने स्वारगेट-पुणे येथून फोन केल्याची माहिती दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी स्वारगेट परिसर, बसस्थानक पिंजून काढले. मुलगा नंदुरबारला जाण्याची शक्यता गृहीत धरून पोलिस शिपाई समीर पवार व मुलाचे वडील स्‍वारगेट बसस्थानकात उभे असताना त्‍यांना घाबरलेल्‍या अवस्‍थेत मुलगा सापडला. पोलिसांनी त्‍याला खोपोलीत आणून चौकशी केली, त्‍यानंतर पालकांच्या ताब्‍यात दिले.

घराबाहेर पडताना १५ वर्षीय मुलाकडे पैसे नव्हते. खोपोलीहून कर्जत येथे रेल्वेने तो विनातिकिट गेला. तेथून एक्स्प्रेसमध्ये बसून पुण्याला उतरला. नंदुरबार येथील जुबेरचा फोन नंबर तोंडपाठ असल्याने त्‍याने स्‍वारगेट बसस्थानकातून एका प्रवाशाच्या मोबाईलवरून जुबेरला फोन लावला. याच क्रमांकावरून पोलिसांना मुलाचा ठावठिकाणा कळला आणि त्‍याला ताब्‍यात घेतले. घरातून निघाल्यापासून मुलगा उपाशी असल्‍याने क्षीण झाला होता, पोलिसांनी त्‍याला भरपेट जेवण दिले आणि त्‍यानंतर खोपोलीला आणले. या शोधकार्यासाठी खोपोलीतील पोलिस निरीक्षक सचिन हिरे, सहाय्यक निरीक्षक सुजित गडदे, महिला उपनिरीक्षक पूजा चव्हाण, हवालदार संदीप चव्हाण, शिपाई समीर पवार यांनी महत्त्‍वपूर्ण कामगिरी बजावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Protest: सोशल मीडियावरील बंदीवरून नेपाळ ढवळून निघाला; भारताने नागरिकांना सतर्कतेचा सल्ला दिला, सांगितलं...

महाराष्ट्राच्या Shivam Lohakare ने मोडला 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राचा विक्रम; पण, होणार नाही अधिकृत नोंद, कारण...

Pune News : विसर्जन मिरवणुकीत हायटेक पोलिसिंग; चेहरा ओळख तंत्रज्ञानाचा अचूक वापर; सराईत गुन्हेगारांवर चाप

Shivaji Maharaj: इतिहासातील गुपित! छत्रपती शिवाजी महाराजांनी बोटं छाटल्यानंतर शाहिस्तेखान कुठं पळाला? पुढं कधीच परतला नाही

Thane Crime: सोनसाखळी चोरणारी आंतरराज्य टोळी गजाआड, तीन सराईत गुंडांना अटक

SCROLL FOR NEXT