मुंबई

जिल्हा रुग्णालयामुळे रुग्णांना नवजीवन

CD

पालघर, ता. २२ (बातमीदार) : रक्तदान हे पवित्र दान आहे. रक्त पुरवठा शरीराला वेळेत झाला नाही, तर सजीवाला जीव गमवावा लागतो. जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीमार्फत नागरिकांना रक्तदान करण्यात येते, तसेच रक्तदान करण्यासाठी शिबिर आयोजित करून रुग्णांना नवजीवन देण्याचे उत्तम कार्य जिल्हा रुग्णालयामार्फत करण्यात आल्याचे प्रतिपादन वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले.

पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पालघर जिल्हा रुग्णालय येथील रोटरी क्लब ऑफ मुंबई यांच्यावतीने उभारण्यात आलेल्या रक्तपेढीचे उद्‍घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी आमदार राजेंद्र गावित, जिल्हा परिषदेचे पालघरचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम, जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रामदास मराड, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. बाळकृष्ण इनामदार व सदस्य, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कर्तव्यदक्षतेने कोणत्याही प्रकारचा मोठेपणा, तसेच गाजावाजा न करता रोटरी क्लब ऑफ मुंबईचे सदस्य काम करतात, याचा मला आनंद आहे. भविष्यामध्ये रोटरी क्लबचे सहकार्य अशाच प्रकारे पालघर जिल्ह्यातील नागरिकांना मिळत राहील. ही रक्तपेढी पालघर जिल्ह्यातील रुग्णांसाठी नवसंजीवनीचे काम करेल, असा विश्वास पालकमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला.

रोटरी क्लब ऑफ मुंबई यांच्यामार्फत रक्तपेढीतून आजपर्यंत २५२ रुग्णांना रक्तपुरवठा करण्यात आला. तसेच पालघर रुग्णालय रक्तपेढी अंतर्गत पाच रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते, असे पालकमंत्री नाईक यांनी सांगितले. नाईक यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सुरंगी आणि बकुळी या रोपांची लागवड करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Crime : बीडमधून धक्कादायक बातमी..! गेवराईतील उपसरपंचाचा गोळीबारात मृत्यू, बार्शीतील सासुरे गावात कारमध्ये आढळून आला मृतदेह

Asia Cup 2025: "बिना मतलब का क्यों उंगली करें?" सूर्यकुमार यादवच्या विधानाने हश्या पिकला; Sanju Samson च्या प्रश्नावर म्हणाला, चिंता नसावी...

Nirmalya collection:'गणेशोत्सवात सातारा जिल्ह्यात १० टन निर्माल्य संकलन'; डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा उपक्रम; खतनिर्मितीच्या प्रक्रियेस सुरुवात

आता तू वाचत नाही! प्रियाचा जीव घेण्यासाठी महीपत इस्पितळात पोहोचला; नेटकरी म्हणतात- अरे काय टाइमपास लावलाय...

लालबाग राजाच्या विसर्जनावरून वाद, गुजराती कंपनीला कंत्राट दिलं म्हणणाऱ्याविरोधात मंडळ कोर्टात जाणार

SCROLL FOR NEXT