मुंबई

संकटातून मार्गक्रमणाची ऊर्जा

CD

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २४ : आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस गटारी म्हणून साजरी करण्याचे प्रस्त वाढले आहे, पण रायगड जिल्ह्यात कोळी, आगरी, कुणबी बांधवांसाठी दीप अमावस्येला आगळेवेगळे महत्त्व आहे. या दिवशी श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी केली जाते. तसेच संकटातून मार्गक्रमणाची ‘दीप’ऊर्जा मिळते.
आषाढी अमावस्येनंतर पावसाचे प्रमाण कमी होत जाते. समुद्र शांत होण्यास सुरुवात होत असल्याने मॉन्सूनमधील निसर्गाच्या रौद्र रूपातून जसे आमचे संरक्षण केलेस तसेच यापुढेह संकटातून मार्गक्रमण करण्यासाठी वाट दाखव, असे म्हणत येथील कृषक, मच्छीमार दिवे लावून पूजा करतात. रायगड जिल्ह्यात दीप अमावस्या पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाते. श्रावण महिन्यातील पहिला दिवस म्हणूनही या अमावस्येला महत्त्व आहे. पौर्णिमा किंवा अमावस्येला हिंदू धर्मात महत्त्व आहे. आषाढी अमावस्येच्या दिवशी येथील घराघरातील वातावरण शुद्ध आणि स्वच्छ असते. सकाळी देवतांची पूजा केल्यानंतर देव्हाऱ्यात दिवसभर दिवा तेवत ठेवला जातो. कोळी लोकांच्या घरात या दिवशी मांगल्याचे वातावरण असल्याचे कोळी समाजाचे नेते शंकर पेरेकर सांगतात.
-------------------------------------------------
आषाढी अमावस्येला दिव्यांची पूजा केल्यामुळे घरातील सकारात्मकता वाढते. दीपपूजन केल्यामुळे घरामधील आर्थिक चणचण दूर होऊन सर्व सदस्यांमधील मतभेद दूर होण्यास मदत होईल. दीपपूजनाच्या वेळी तुमच्या मनातील सर्व त्रास दूर करून सकारात्मक विचार करा. आषाढी अमावस्येच्या दिवशी दीपपूजन केले जाते.
- शांताराम पाटील, समाजनेते
----------------------------
ग्रामीण भागात
दीप अमावस्या साजरी
रेवदंडा, ता. २४ (बातमीदार) : आजही ग्रामीण भागात नागरिक पारंपरिक पद्धतीने रूढी-परंपरा पाळतात. त्याप्रमाणे आजची आषाढी अमावस्या साजरी करण्यात आली. घराच्या अडगळीत पडलेले धुऊन पुसून त्यात तेल घालून प्रज्वलित करून पूजा केली जाते.
काही कुटुंबात कणकेचे दिवे बनवून दक्षिण दिशेला फिरवून पितरांना समर्पित करण्याची पद्धत आहे. दीपपूजन व पितरांचे स्मरण म्हणजे पितृपूजन समजले जाते. आषाढ महिना म्हणजे पर्जन्यवृष्टीचा काळ या अमावस्येला शेतकरी आणि ग्रामीण भागातील पिकाच्या समृद्धीसाठी प्रार्थना करतात. हा दिवस अध्यात्म आणि साधनेसाठी शुभ दिवस मानला जातो. या दिवशी उपवास, पाप, तप, दान करण्याची प्रथा आहे. प्रसादासाठी खिर-पुरी तर काही ठिकाणी मोदक बनवले जातात. उद्यापासून श्रावण महिना सुरू होणार असल्याने हा पवित्र महिना हिंदू संस्कृतीत मानला जातो. अनेक कुटुंबे मांसाहार तसेच कांदा, लसूण वर्ज्य करतात.

----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: पत्नीचं दिरासोबत सूत जुळलं, नंतर लग्नही केलं, पण पतीचा पारा चढला, रागात सासूसोबत नको ते करून बसला

पल्स पोलिओची ॲम्बेसेडर ते फाउंडेशनची स्थापना, फक्त अभिनय नाही समाजकार्यातही पुढे आहे ऐश्वर्या राय, अभिनेत्रीबद्दल या गोष्टी माहीत आहेत का?

मराठी मालिकेची परदेशात हवा, न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरवर झळकली कमळी, व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : गोदावरी नदीवर नवा रामसेतू पूल बांधणार- गिरीश महाजन

Thane News: भंडाराचं जेवण खायला गेला पण तिथेच...; डोंबिवलीत १३ वर्षीय आयुषसोबत नेमकं काय घडलं? घटना वाचून काळीज पिळवटून जाईल

SCROLL FOR NEXT