मुंबई

वेगाच्या नादात मृत्यूच्या दारात

CD

वेगाच्या नादात मृत्यूच्या दारात
मुंबई-पुणे द्रुतगतीवर अपघातांची मालिका, साडेचार वर्षांत ३३५ जणांचा मृत्यू
वसंत जाधव ः सकाळ वृत्तसेवा
पनवेल, ता. २६ ः मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गामुळे करोडोंचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे; परंतु मार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. गेल्या साडेचार वर्षांमध्ये या मार्गावर ३३५ प्रवाशांचा मृत्यू झाला. त्यामुळे वेगाच्या नादात अनेकजण मृत्यूच्या दारातच पोहोचले आहेत.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेग मर्यादेचे सर्रास उल्लंघन केले जाते. ठरलेल्या वेगाहून अधिक वेगाने वाहने धावत असल्याने अपघाताची मालिका सुरूच आहे. त्यामुळे हा महामार्ग मृत्यूचा एक प्रकारे सापळा बनला आहे. शेकडो कॅमेरे लावून वाहनांच्या वेगावर निमंत्रण मिळवण्यात अपयश आल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत.
------------------------------------------
महामार्गाची लांबी - ९० किलोमीटर
हलक्या वाहनांना वेगमर्यादा - १०० किलोमीटर
जड वाहनांना वेगमर्यादा - ८० किलोमीटर
-----------------------------------------
अपघाताची कारणे
स्वतंत्र मार्गिकांकडे दुर्लक्ष
टायर फुटून वाहने पलटी होणे
चालकांना डुलकी लागणे
------------------------------------
अवजड वाहनांची अरेरावी
अवजड वाहनांना मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर स्वतंत्र मार्गिका देण्यात आलेली आहे. तर कारसाठी स्वतंत्र मार्गिका आहे. त्याचबरोबर ओव्हरटेक करण्यासाठी उजव्या बाजूला एक मार्गिका देण्यात आलेली आहे; परंतु अवजड वाहने डाव्या बाजूला सोडून कार आणि ओव्हरटेक करणाऱ्या मार्गिकावर कब्जा करीत आहेत.
-------------------------------------------
सहा महिन्यांत १०० अपघात
अद्ययावत यंत्रणा कार्यान्वित होऊनही अपघातांची संख्या कमी होत नाही. जानेवारी ते जून या सहा महिन्यांत १०० अपघात झाले आहेत. यात ३० प्रवाशांचा मृत्यू झाला, तर ६२ गंभीर आणि ५३ जण किरकोळ जखमी झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत अपघातांची संख्या घटली असली तरी अपघातांचे प्रमाण मात्र जास्तच आहे.
----------------------------------------
द्रुतगती महामार्गावरील अपघात
वर्ष अपघात मृत्यू गंभीर किरकोळ (जखमी)
२०२१ २०० ८८ १४६ १८
२०२२ ११८ ९२ १४४ ३३
२०२३ १५४ ६५ ८९ ३२
२०२४ १९१ ९० १४३ ६५
़़़़़़़़़़़़़़़़़़ः--------------------------------
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अंतर जलद गतीने कापण्यासाठी वेग मर्यादाचे उल्लंघन होते. या महामार्गावरून प्रवास करणे खूप धोकादायक झाले आहे. यासंदर्भात जनजागृती, प्रबोधन होणे गरजेचे आहे.
- अनिल खेडकर, प्रवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates: इचलकरंजीत पंचगंगा नदीवरील जूना पूल वाहतूकीस बंद

सावली, तारा की ऐश्वर्या कोण मारणार बाजी? 'सावळ्याची जणू सावली'मध्ये रंगणार 'आम्ही सारे खवय्ये'ची मेजवाणी

Nashik Crime : 'जीएसटी' बनावट सॉफ्टवेअर प्रकरण; देवळालीतील इंजिनिअर ताब्यात, गुप्तचारांची झडती सुरू

Women's Chess World Cup : दिव्या-हंपी पहिला डाव बरोबरीत, महिला विश्वकरंडक बुद्धिबळ; दोघींनीही वर्चस्वाची संधी गमावली

Nagpanchami Special Recipe: नागपंचमीला घरच्या घरी बनवा पौष्टिक ज्वारीच्या लाह्या, लगेच लिहून घ्या रेसिपी

SCROLL FOR NEXT