मुंबई

ठाकरेंच्या युवासेनेकडून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा उपयुक्त पुस्तकांची भेट

CD

ठाकरेंच्या युवासेनेकडून स्पर्धा परीक्षा पुस्तकांची भेट
कल्याण, ता. २७ (बातमीदार) : शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना कल्याण पूर्वतर्फे समाजाभिमुख उपक्रम राबविण्यात आला. बी पब्लिकेशन यांच्या सौजन्याने कोळसेवाडीतील ज्ञानेश्वर माउली सार्वजनिक ग्रंथालयात स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त पुस्तके उपलब्ध केली आहेत.
दरवर्षी देशभरात विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये कोट्यवधी विद्यार्थी सहभागी होतात. यामध्ये विविध शासकीय परीक्षा, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षा तसेच व्यवस्थापन आणि इतर क्षेत्रांतील परीक्षांचा समावेश असतो. विद्यार्थ्यांना परीक्षांची तयारी करण्यासाठी उपयुक्त असणारी पुस्तके युवासेनेने उपलब्ध करून दिल्याने विद्यार्थ्यांना दर्जेदार व माहितीपूर्ण पुस्तकांचा लाभ मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या ज्ञानयात्रेसाठी हे एक प्रेरणादायी पाऊल असल्याचे या वेळी युवासेना शहर अधिकारी अ‍ॅड. नीरज कुमार म्हणाले.
याप्रसंगी ग्रंथालयाचे अध्यक्ष तानाजी शहाणे, शिवसेना उबाठा विधानसभा क्षेत्र प्रमुख नारायण पाटील, शहरप्रमुख शरद पाटील, उपशहर अधिकारी दत्तात्रेय पाखरे, शांताराम डिगे, शांताराम गुळवे, पंकज पांडे, उमेश परब, रमेश तिखे, हेमंत चौधरी, जगदीश जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad vs WI: इंग्लंड-ऑस्ट्रेलियात संधीही न दिलेल्या ईश्वरनला भारतीय संघातून का वगळलं? आगरकरने स्पष्ट शब्दातच दिलं उत्तर

Latest Marathi News Live Update : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, त्यांना कर्जमुक्त करा - उद्धव ठाकरेंची मागणी

Sanjay Gandhi Scheme : वाढीव अनुदानाचा सुमारे चार हजार निराधारांना आधार, संजय गांधी निराधार योजना; दीड हजाराऐवजी अडीच हजार रुपये मिळणार

माेठी बातमी! 'लाडक्या बहिणी नाराज; ई-केवायसीचे पोर्टल अडखळल्याचा परिणाम'; आधार ओटीपी येईना, मोबाईल नंबरही जुळेनात

Nanded Flood: साहेब! दिवाळी, दसरा कसा साजरा करावा? तुटपुंज्या मदतीमुळे मुक्रमाबाद परिसरातील शेतकऱ्यांचा आर्त सवाल

SCROLL FOR NEXT