मुंबई

नवी मुंबई थोडक्‍यात

CD

सिवूड्स मॉलमध्ये वाहतूक जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांचे पथनाट्य
नवी मुंबई (वार्ताहर) : सिवूड्स वाहतूक शाखेच्या वतीने ‘वाहतूक सुरक्षा जनजागृती अभियान’ अंतर्गत नेक्सस सिवूड्स मॉलमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ज्ञानदीप सेवा मंडळाच्या प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी ट्रॅफिक कवायत व प्रभावी पथनाट्य सादर करून नागरिकांचे लक्ष वेधले. पथनाट्यातून हेल्मेट वापर, सिग्नलचे पालन, अपघात टाळण्यासाठी नियमांचे पालन आदी मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला. कार्यक्रमाचे दिग्दर्शन आरएसपी शिक्षक हरेश तांडेल यांनी केले. पोलिस उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या सूचनेनुसार व वरिष्ठ निरीक्षक मोहिनी लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. या उपक्रमास मॉलचे व्यवस्थापक, मुख्याध्यापक बंकट तांडेल व शिक्षकवृंद उपस्थित होते.
................
कारगिल विजयदिनानिमित्त व्याख्यान व चित्र प्रदर्शन
नेरूळ (बातमीदार) : एफ. जी. नाईक महाविद्यालय, कोपरखैरणे येथील राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे कारगिल विजयदिनानिमित्त व्याख्यान व भित्तिचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते महेश शिंदे यांनी कारगिल युद्धाची पार्श्वभूमी आणि देशभक्तीचे महत्त्व अधोरेखित केले. प्रमुख पाहुण्यांमध्ये केशवदास व ज्ञानेश्वर लोखंडे सहभागी होते. प्राचार्य डॉ. प्रताप महाडिक यांनी उद्घाटन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रमोद साळुंखे तर आभार प्रा. समिधा पाटील यांनी मानले. स्पर्धेतील चित्रांचे महाविद्यालयात प्रदर्शन लावण्यात आले.
...................
सानपाड्यात खड्ड्यांचा प्रश्न गंभीर
नेरूळ (बातमीदार) : सानपाडा सेक्टर-५ ते गावातील कमानीपर्यंतचा रस्ता खड्ड्यांनी व्‍यापला आहे. त्‍यामुळे नागरिक, विद्यार्थी व वाहनचालक त्रस्त झाले आहेत. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते नीलेश कचरे यांनी पालिकेच्या दुर्लक्षावर नाराजी व्यक्त केली असून, कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी ‘वॉटर बेस मॅनेजमेंट’ तंत्र वापरण्याची मागणी केली आहे. दरवर्षी तात्पुरती मलमपट्टी होत असून, यंदा ठोस उपाय हवा, असे ग्रामस्थांचे मत आहे.
...................
ओला-सुका कचरा डब्याचे वाटप
तुर्भे (बातमीदार) : माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांच्या पुढाकाराने सानपाडा विभागातील सोसायट्यांना ओल्या व सुक्या कचऱ्यासाठी स्वतंत्र डबे वाटप करण्यात आले. पालिकेकडून डबे मिळत नसल्याने रहिवाशांना महागात डबेखरेदी करावी लागत होती. त्यामुळे भगत यांनी घनकचरा विभागाकडे पाठपुरावा करून डबे उपलब्ध करून दिले. हे वाटप माजी नगरसेविका वैजयंती व निशांत भगत यांच्या हस्ते झाले.
.................
पीओपी मूर्ती विसर्जन धोरण जाहीर होण्याची प्रतीक्षा
जुईनगर (बातमीदार) : मुंबई उच्च न्यायालयाने सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जनास बंदी घातल्याने कृत्रिम तलावांची आवश्यकता वाढली आहे. भाजप युवा आघाडीचे माजी अध्यक्ष दत्ता घंगाळे यांनी पालिकेकडे स्पष्ट धोरण जाहीर करण्याची मागणी केली. नागरिक व गणेश मंडळांसाठी जनजागृती, सामूहिक बैठकांचे आयोजन, कृत्रिम तलावांची उभारणी व मूर्ती विक्रेत्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करावी, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS: विराट कोहली आणि रोहित शर्माचे पुनरागमन होणार? ऑस्ट्रेलियाविरुद्ध ODI मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा कधी? तारीख आली समोर

Prakash Ambedkar : भाजप, आरएसएसच्या विचारसरणीत ‘मदत’ हा शब्दच नाही; ‘वंचित’चे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांची टीका

Pune News : महापालिकेची प्रभाग रचना सोमवारपर्यंत जाहीर होणार

Pune Crime : कुख्यात गुंड नीलेश घायवळचा पासपोर्ट रद्द करणार - पोलिस आयुक्त अमितेश कुमार

Latest Marathi News Live Update: नगरपरिषद, नगरपंचायत नगराध्यक्ष आरक्षण सोडत ६ ऑक्टोबरला

SCROLL FOR NEXT