पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पालिका सरसावली
थर्माकोलमुक्त आरास, ध्वनिप्रदूषण रोखण्यावर भर
वाशी, ता. २७ (बातमीदार) : येत्या २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी पर्यावरणपूरक, प्लॅस्टिक व थर्माकोलमुक्त सजावट, तसेच ध्वनिप्रदूषण टाळण्याचे आवाहन केले आहे. यासाठी महापालिकेच्या वतीने विविध विभागांसमवेत नियोजन बैठक घेण्यात आली.
महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्र येथे पार पडलेल्या या बैठकीत महापालिका, पोलिस विभाग, वाहतूक पोलिस, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महावितरण, तसेच नवी मुंबईतील ६३ सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रोत्सव मंडळांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. गणेशमूर्ती आणि आरास पारंपरिक पद्धतीने व पर्यावरणपूरक असावी, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. गतवर्षी परवाना घेतलेल्या मंडळांना तो पाच वर्षांसाठी वैध राहणार आहे; मात्र यावर्षीही पोलिस, वाहतूक पोलिस आणि अग्निशमन विभागाकडून नाहरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. यासाठी महापालिकेच्या ऑनलाइन पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले. नवीन मंडळांसाठीही ऑनलाइन अर्ज बंधनकारक आहे.
.................
वाहतुकीचा अडथळा होणार नाही
वाहतूक पोलिस उपआयुक्तांनी स्पष्ट केले, की मंडप व कमानी रस्त्यावर येणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. तसेच विनापरवानगी मंडप उभारणी टाळावी. वाहतूक कोंडी होणार नाही, यासाठी गणेशोत्सव काळात जड वाहनांवर निर्बंध लावले जाणार आहेत.
.............
आरास आणि जाहिरातीत मर्यादा हवी
गणेश मंडळांनी सामाजिक तेढ टाळणारे देखावे, मर्यादित जाहिराती लावाव्यात, जेणेकरून शहराचे विद्रुपीकरण होणार नाही, असे आवाहन करण्यात आले. निर्माल्य आणि पूजेचे साहित्य महापालिकेच्या ‘निर्माल्य कलशां’मध्येच टाकण्याचे आवाहन अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे यांनी केले.
.....................
चौकट
कृत्रिम तलावात विसर्जन बंधनकारक
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माहितीनुसार, उच्च न्यायालयाच्या २३ जुलै २०२५च्या आदेशानुसार, पाच फुटांपेक्षा कमी उंचीच्या पीओपी गणेशमूर्तींचे फक्त कृत्रिम तलावांतच विसर्जन करता येईल. यासंदर्भात महापालिकेमार्फत जनजागृती मोहीम राबवली जाणार असल्याचेही आयुक्त डॉ. शिंदे यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.